Tarun Bharat

पॅरिस पॅराऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन प्रकारात सोळा पदके

Advertisements

वृत्तसंस्था/ पॅरिस

2024 पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात एकूण 16 पदकांसाठी इव्हेंट्स असतील. सदर घोषणा शनिवारी आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीने केली. 2020 टोकियो पॅरा ऑलिम्पिकच्या तुलनेत आगामी पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात 2 पदकांची वाढ करण्यात आली आहे.

पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या एकेरी एसएल-3 तसेच महिला एकेरी एसएच-6 हे नवे प्रकार राहतील. पुरुष आणि महिला एकेरीच्या प्रकाराप्रमाणे आता पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत दुहेरीच्या प्रकारांची संख्या सारखीच राहील. मात्र, पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमधून बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात महिला दुहेरी एस.एल.-3 आणि एस.यु.-5 वगळण्यात आले आहेत. पॅरा बॅडमिंटन प्रकारात बॅडमिंटनपटूंची संख्या वाढत असल्याने पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये महिलांसाठी एकूण विक्रमी 235 पदकांसाठी सामने खेळविले जातील.

Related Stories

ग्रॅण्डमास्टर मॅमेडोव्हची आनंदवर बाजी

Patil_p

युरोपमधील तीन संघ निश्चित

Patil_p

कोरोनाने घेतली ‘आयपीएल’ची विकेट

Patil_p

इंडिया क महिला संघाकडे चॅलेंजर करंडक

Patil_p

भारत-लंका यांच्यात आज महत्त्वाची लढत

Patil_p

व्हेट्टेलला सलग दुसरी शर्यत हुकणार

Patil_p
error: Content is protected !!