Tarun Bharat

पेंडूर सरपंच गीतांजली कांबळे यांचे सरपंच व सदस्य पद रद्द

Advertisements

वेंगुर्ला/प्रतिनिधी-

वेंगुर्ला तालुक्यातील पेंडूर ग्रामपंचायतीचे सरपंच गीतांजली गुंडू कांबळे यांना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1949 चा मुंबई अधिक क्रमांक अधिनियम क्रमांक 3 कलम 39 (1) अन्वये पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याचे कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी 20 जून 2022 च्या आदेशाने जाहीर केले आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम कलम 38 व महाराष्ट्र ग्रामपंचायत तपासणी आणि कागदपत्रांची तपासणी त्यांचा शोध नियम 1963 मधील 42 मधील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कारवाई करण्याबाबत प्रस्ताव सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला होता. वेंगुर्ले गटविकास अधिकारी यांच्या अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोकण विभागाचे विभागीय आयुक्त यांना आपला अहवाल सादर केला. या अहवालात पेंडूर ग्रामपंचायतच्या दिनांक 25 जुलै 2019 च्या मासिक सभेत सर्वानुमते ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन देण्याबाबत मंजुरी देण्यात आलेली आहे. वेंगुर्ले पंचायत गटविकास अधिकारी यांच्या 23 मार्च 2020 रोजी याबाबत लेखी निर्देश दिलेले असताना व ग्रामसेवक यांनी 15 मे 2020 रोजी धनादेशावर सही केलेली असतानासुद्धा सरपंच यांनी धनादेशावर सही केलेली नाही. त्यामुळे सरपंच यांनी नियमाचे उल्लंघन केले आहे त्यानुसार कोकण विभागाचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चा अधिनियम मुंबई अधिनियम क्रमांक 3 कलम 39 (1) नुसार सरपंच गीतांजली कांबळी यांना पेंडूर ग्रामपंचायत सरपंच पदावरून तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून काढून टाकण्यात आल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Related Stories

रत्नागिरी : लांजाचा आठवडा बाजार गजबजला, ग्राहकांची मात्र पाठ

Abhijeet Shinde

राष्ट्रीय बीच रस्सीखेच स्पर्धेत पुरूष गटात पंजाब तर महिला गटात केरळ या संघानी पटकावली सुवर्ण पदके

Ganeshprasad Gogate

पोलीस पाटलांना योग्य मोबदला द्यावा!

NIKHIL_N

‘वनविड, योजना’ची उत्पादनबंदी उठवली !

Abhijeet Shinde

राज्य अजिंक्यपद खो-खोसाठी रत्नागिरीचे पुरूष-महिला संघ रवाना

Patil_p

तळई दुर्घटना : पंतप्रधान मोदींकडून आर्थिक मदतीची घोषणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!