Tarun Bharat

पेगासस कांड महाराष्ट्रात ही झाले का? , राज्य सरकारने चौकशी करावी – सचिन सावंत

Advertisements

मुंबई\ ऑनलाईन टीम

इस्त्रायलच्या पेगासस सॉफ्टवेअरचा वापर करुन भारतातील पत्रकार, राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यात येत होती, असा दावा ‘द वायर’सह जगभरातील १५ मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. सध्या याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे सचिव आणि प्रवक्ते संचिन सावंत यांनी फडणवीस सरकारच्या काळात पेगासस सॉफ्टवेअर वापरून महाराष्ट्रात ही हेरगिरी आणि फोन टॅपिंग झालं का? याची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

संचिन सावंत यांनी एगामागे एक ट्वीट करत याविषयी भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पेगॅसस कांड महाराष्ट्रात ही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे. महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगॅसिस सॉफ्टवेअर च्या वापराच्या बातम्या ही येत होत्या.

किती वेळा कोण अधिकारी इस्त्रायल गेले? NSO बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? NSO शी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदर ही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती. दिग्विजय सिंह यांनीही मागणी केली होती. देशात पेगॅसिस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजप शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता आणि हेतू आहे, असं सचिन सावंत यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Related Stories

लोकशाही व शिक्षणाच्या माध्यमातून समाजबदल हा डॉ.आंबेडकरांचा विचार

Rohan_P

बिग बॉस फेम एजाज खानला NCB कडून अटक

Rohan_P

रेशनींग साठी पावशेवाडीत नागरीकांची एकच गर्दी

Patil_p

उद्योग केंद्रीत अभ्यासक्रमांची निर्मिती करा, UGC चे निर्देश

datta jadhav

शहरात ३८ तर ग्रामीणमध्ये ३० नवे रुग्ण

Abhijeet Shinde

फडणवीस सरकारने पाच वर्षे केवळ अभ्यास केला

Abhijeet Shinde
error: Content is protected !!