Tarun Bharat

पेटीएमद्वारे भरा एलआयसीचा हप्ता

दोन्ही कंपन्यांमध्ये झाला करार – डिजिटल पेमेंटला मिळणार बळ

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)ने आपल्या ग्राहकांना हप्ता भरण्यासाठी आणखी सुलभ पर्याय उपलब्ध केला आहे. एलआयसीने पेटीएमसोबत करार केला आहे. त्यामुळे पेटीएममार्फत यापुढे एलआयसीचे हप्ते भरता येणे शक्मय होणार आहे.

डिजिटल पेमेंटची व्यवस्था करणाऱया पेटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना यापुढे ऑनलाईन (ऑफिसला न जाता) पॉलिसीचा हप्ता भरता येणार आहे. कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर, मास्क, लॉकडाऊनच्या काळात पेटीएमशी केलेली भागीदारी एलआयसीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

एलआयसीने रक्कम भरणा प्रक्रिया ऑनलाईन अधिक सोपी केली आहे. ग्राहकांना रक्कम भरण्यासाठी विविध सुलभ पर्याय उपलब्ध केले आहेत. कोरोनाच्या फैलावामुळे  खबरदारी म्हणून अनेक जण ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य देत आहेत. 60 हजार कोटीहून अधिकची रक्कम (प्रीमीयम) डिजिटल माध्यमातून प्राप्त झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. बँकांकडून होणाऱया प्रिमीयम भरणासंबंधीची आकडेवारी यात समाविष्ट करण्यात आलेली नाही.

Related Stories

कॉंग्रेसच्या नियोजन समितीवर महाराष्ट्रातून 4 जणांचा समावेश

Archana Banage

बैसाखी : पहिल्यांदाच सर्वत्र शुकशुकाट

Patil_p

रतन टाटांना भारतरत्न देण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Abhijeet Khandekar

दिल्ली विधानसभा पूर्णपणे पेपरलेस होणार

datta jadhav

दिल्लीतील कोरोना : मागील 24 तासात 39 नवे रुग्ण, एकही मृत्यू नाही

Tousif Mujawar

सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर शस्त्रक्रिया

Patil_p