Tarun Bharat

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. देशात दहा दिवसात ९ वेळा इंधन दरात वाढ झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलीटर ८० पैशांची वाढ झाली आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणूक लागल्यापासून इंधन दरात वाढ झालेली नव्हती. नोव्हेंबरनंतर २२ मार्च पासून इंधन दरात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, देशात गेल्या १० दिवसांत नवव्यांदा इंधनाचे दर वाढले आहेत. यामुळे फक्त गेल्या १० दिवसांत पेट्रोल आणि डिझेल तब्बल ६ रुपये ४० पैशांनी महागलं आहे.

देशात इंधनाचे दर वाढले असल्याने दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलीटर १०१ रुपये ८१ पैसे झाला आहे. याआधी हा दर १०१ रुपये १ पैसे होता. तर दुसरीकडे डिझेलचा दर प्रतिलीटर ९२ रुपये ७ पैशांवर पोहोचला आहे. याआधी हा दर ९३ रुपये ७ पैसे होता.

Related Stories

महाविकास आघाडीला धक्का; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता

Archana Banage

दिल्ली : काँग्रेस नेते अशोक कुमार वालिया यांचे कोरोनाने निधन

Tousif Mujawar

मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास तात्काळ थांबवा; एनआयएकडे द्या

Tousif Mujawar

धोका वाढला! पंजाबमध्ये 4,957 नवे कोरोना रुग्ण; 68 मृत्यू

Tousif Mujawar

पंतप्रधान मोदी उद्या सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार

datta jadhav

राजस्थानात गुर्जर आंदोलन : इंटरनेट बंद

Patil_p