Tarun Bharat

पेट्रोल काढताना लायटर पेटवणे बेतले तरूणाच्या जीवावर

प्रतिनिधी/ रत्नागिरी

 दुचाकीमधील पेट्रोल बाटलीमध्ये काढताना सिगरेटसाठी लायटर पेटवणे तरूणाच्या जीवावर बेतल़े या पेट्रोलच्या भडक्यामध्ये भाजून गंभीर जखमी झालेल्या या तरूणाचा शुक्रवारी जिल्हा शासकीय रूग्णालयात मृत्यू झाल़ा वसीम सल्लाउद्दीन पठाण (32, ऱा  शेटय़ेनगर, रत्नागिरी) असे मृत झालेल्या तरूणाचे नाव आह़े

या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की वसीम हा 12 मार्च रोजी आपली सासूरवाडी असलेल्या कोतवडे येथे गेला होत़ा दरम्यान वसीम हा दुचाकीमधून (एमएच 08 एन 204) पेट्रोल प्लास्टिकच्या बाटलीमध्ये काढत होत़ा याचवेळी त्याला सिगारेट पिण्याची लहर आली त्यामुळे त्याने खिशातील सिगारेट काढून ती लायटरने पेटवण्याचा प्रयत्न केला. याचवेळी लायटर पेटताच बाटलीमधील पेट्रोलने काही क्षणात  पेट घेतल्याने मोठा भडका उडाल़ा यामध्ये वसीम हा भाजून गंभीर जखमी झाला. नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल केल़े मात्र उपचारादरम्यान वसीम याचा मृत्यू झाल़ा या प्रकरणी त्याची पत्नी अस्फिया वसीम पठाण (30, ऱा शेटय़ेनगर) यांनी हिने रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत माहिती दिली आहे.

Related Stories

रेड झोनमधील ट्रक चालकांचा बांद्यात मुक्त संचार

NIKHIL_N

जिह्यात 7 हजार चाचण्यांचे लक्ष कोसो दूर

Patil_p

रत्नागिरी : वरवलीत तब्बल २७ जणांना कोरोनाची बाधा

Archana Banage

कारीवडे-पेडवे अपघातात सावंतवाडीतील दोन युवक गंभीर जखमी

Anuja Kudatarkar

विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी शरद मेस्त्री

Anuja Kudatarkar

भोस्ते घाटात 30 फूट दरीत टँकर कोसळला

Patil_p