Tarun Bharat

पेट्रोल – डिझेलचे दर भडकले

प्रतिनिधी/ बेळगाव

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात स्थिर असणारे दर 7 जूनपासून वाढण्यास सुरुवात झाली आहे. पेट्रोलच्या दरात 5.19 रुपये तर डिझेलच्या दरात 4.99 रुपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ अशीच राहिली तर पेट्रोलचे दर 80 पार करतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून इंधनाचे दर टिकून होते. एप्रिल व मे महिन्यात पेट्रोलचा दर 73.57 व डिझेलचा दर 66.02 रुपये इतकाच होता. लॉकडाऊनमध्ये वाहनांची वर्दळ कमी असल्याने दर स्थीर होते. लॉकडाऊनची नियमावली शिथिल केल्यानंतर इंधनाच्या मागणी वाढ होत गेली. 7 जूनपासून पेट्रोल व डिझेलचे दर वाढू लागले.

दररोज 50 ते 60 पैशांनी इंधनाचे दर वाढत आहेत. सोमवारी बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 78.76 रुपये तर डिझेलचा दर 71.01 रुपये इतका होता. आधीच कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. महागाई वाढत असताना आता इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशांत मेलगे (बेळगाव पेट्रोलिअम डिलर्स असोसिएशनचे सदस्य)

जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल व डिझेलचे दर वाढले आहेत. 1 एप्रिल ते 6 जूनपर्यंत इंधनाचा दर स्थिर होता. आता दररोज 50 ते 60 पैशांनी दरवाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

बोरगाव नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 50 उमेदवार रिंगणात

Patil_p

सातबारावर आमची नावे तातडीने दाखल करा

Patil_p

वृत्तपत्र विक्रेत्यांना सॅनिटायझर्सचे वितरण

Patil_p

मराठी कागदपत्रांसाठी आज एल्गार

Amit Kulkarni

वैजनाथ मंदिर वझर धबधबा पर्यटकांनी फुलला

mithun mane

जि.पं.अध्यक्षा आशा ऐहोळे यांचा पाहणी दौरा

Patil_p