ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेट्रोलियम कंपन्यांनी पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा सपाटा लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली. यामुळे पेट्रोल उच्चांकी स्तरावर गेला आहे. यामुळे महागाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.


त्यानुसार, आज डिझेलच्या किंमतीत 30 ते 31 पैशांनी वाढ झाली तर पेट्रोलच्या किंमतीत 24 ते 25 पैशांनी वाढ झाली. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या किंमती आजवरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.
दिल्लीत डिझेल 73.03 रुपये तर पेट्रोल 87.85 रुपये इतके झाले आहे. कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये डिझेल अनुक्रमे 81.61 रुपये, 84.94 रुपये आणि 83.18 रुपये इतके आहे. तर पेट्रोल 89.16 रुपये, 94.36 आणि 90.18 रुपये इतके वाढले आहे.
- पुण्यात पेट्रोल 93.54 रुपये तर डिझेल…
पुण्यात पेट्रोलचा आजचा दर 93.54 रुपये तर डिझेल दर 82.81 रुपये इतका आहे. तर नाशिकमध्ये पेट्रोलसाठी 93.65 रुपये तर डिझेलसाठी 82.92 रुपये मोजावे लागणार आहेत.