Tarun Bharat

पेट्रोल – डिझेलच्या दरांत पुन्हा वाढ; मुंबईत पेट्रोल शंभरीपार

ऑनलाईन टीम / मुंबई : 


पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा कायम ठेवला आहे. आज पुन्हा एकदा दरात वाढ झाली असून पेट्रोल 25 ते 26 पैसे तर डिझेल 20 ते 30 पैश्यांनी महागले आहे. 


मुंबईत तर पेट्रोलने शंभरी गाठली आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 100. 19 रुपये तर डिझेल 92.17 रुपये इतके झाले आहे. दिल्लीत पेट्रोल 93.94 रुपये तर डिझेल 84.89 रुपये इतके झाले आहे. चेन्नई पेट्रोल 95.51 रुपये तर डिझेल 89.65 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल 93.97 रुपये तर डिझेल 87.74 रुपये इतके वाढले आहे. 

  • भोपाळमध्ये पेट्रोल 102.04 रुपये 


भोपाळमध्ये एक लिटर पेट्रोल 102.04  रुपये मिळत आहे. तर डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर इतके आहे. 

  • दररोज 6 वाजता किमती बदलतात


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात

Related Stories

मार्गदर्शक अन् मित्रासारखी असावी राज्यपालांची भूमिका : राष्ट्रपती

Omkar B

अमेरिकेत महाग, भारतात स्वस्त

Patil_p

जूनमध्ये घसघशीत जीएसटी संकलन

Patil_p

इंधन दरवाढीमुळे विमान प्रवास महागणार

Patil_p

कर्नाटक: एसएसएलसी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Archana Banage

सैन्यतयारी नेहमी उच्चस्तरीय असावी!

Patil_p