Tarun Bharat

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 25 पैसे वाढ

मुंबईत डिझेल, दिल्लीत पेट्रोल उच्चांकी स्तरावर

@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटरमागे 25 पैशांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर पोहचले आहे. तर मुंबईत डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर आहेत. गेल्या तीन दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली नव्हती. चालू वर्षात 1 जानेवारीपासून तीनवेळा पेट्रोल डिझलेच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जानेवारीमध्ये आतापर्यंत पेट्रोल 1.24 रुपयांनी तर डिझेल 1.26 रुपयांनी महागले आहे.

तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केल्याने राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलचे दर 84.95 रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर डिझेलचे दर 75.13 रुपये झाले आहेत. बेंगळूरमध्ये पेट्रोलचे दर 87.82 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 79.67 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर 91.56 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 81.87 रुपये प्रतिललिटर झाले आहेत. कोलकात्यात पेट्रोल 86.39 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 78.72 रुपये झाले आहे. चेन्नईत पेट्रोल 87.82 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 80.43 रुपये प्रतिलिटर झाले आहे. देशातील तेल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच्या दरांचा दररोज आढावा घेत सकाळी 6 वाजल्यापासून सुधारित दरांची अंमलबजावणी केली जाते.

Related Stories

अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या काळात अर्थसंकल्पात झाला मोठा बदल, जाणून घ्या एका क्लिकवर

Archana Banage

नव्या निवडणुका जाहीर करू नका

Patil_p

बिहार, बंगाल, त्रिपुरामध्ये बालविवाहाचे प्रमाण अधिक

Patil_p

प्रचारादरम्यान उमेदवाराने धुतले कपडे

Patil_p

दरवर्षी 26 डिसेंबरला साजरा होणार ‘वीर बाल दिवस’

datta jadhav

24 कॅरेट सोने आता इतिहासजमा

datta jadhav