Tarun Bharat

पेट्रोल – डिझेलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


सरकारी तेल कंपन्यांकडून सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली आहे. आज डिझेल 20 आणि पेट्रोल 21 पैशांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.78 रुपये आहे, तर डिझेलची किंमत प्रति लिटर 81.10 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 97.19 रुपये आणि डिझेलची किंमत 88.20 रुपये प्रति लिटर आहे.  


देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर दररोज सकाळी सहा वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टींची भर घातल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होत आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.


दरम्यान, आज कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेल अनुक्रमे 83.98 रुपये आणि 86.10 रुपये इतके आहे. तर पेट्रोल 90.98 आणि 92.77 रुपये इतके वाढले आहे. 

Related Stories

‘एलटीआय’ आपल्या कर्मचाऱयांना मायक्रोसॉफ्टच्या तंत्रज्ञानावर देणार प्रशिक्षण

Patil_p

योगी सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 418 कोटी रुपयांची मदत

Tousif Mujawar

दिल्लीत दारू होणार स्वस्त

datta jadhav

Tokyo Paralympics: टेबल-टेनिसमध्ये सोनलबेन आणि भाविना पटेल पराभूत

Archana Banage

मास्टर ब्लास्टर सचिनकडून खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

Tousif Mujawar

खळबळजनक !मालवणात सापडला अर्धवट जळालेला मृतदेह

Anuja Kudatarkar