Tarun Bharat

पेट्रोल-डिझेलच्या दरात 15 दिवसांनंतर कपात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात प्रतिलिटर 16 पैसे तर डिझेलमध्ये 14 पैशांची कपात केली आहे. सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर तेल कंपन्यांनी ही कपात केली आहे. ताज्या दरकपातीनंतर दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 90.56 रुपयांवरून 90.40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. तर डिझेल दर 80.87 रुपयांवरून 80.73 रुपयापर्यंत उतरले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोल 96.82 तर डिझेल 87.81 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात फेरबदल झाल्यामुळे इंधन दरात कपात केली आहे. वाढत्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाल्याने देशभरात संतापाचे वातावरण होते. फेबुवारी महिन्यापर्यंतच्या दरवाढीनंतर गेल्या काही दिवसात इंधन दरात तीनवेळा कपात झाली आहे. या कपातीद्वारे पेट्रोल दरात 61 पैशांची तर डिझेल दरात 60 पैशांची कपात झाली आहे.

Related Stories

मुंबईत उद्यापासून मेट्रो धावणार; ग्रंथालयेही सुरू

Tousif Mujawar

आरोग्य, कृषी क्षेत्रांमधील सहकार्य वाढविणार

Patil_p

गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, बचावकार्य सुरु

Archana Banage

जुहीला 5G नेटवर्क विरोधात याचिका करणे पडले महागात ; दिल्ली उच्च न्यायालयाकडून २० लाखांचा दंड

Archana Banage

Rahul Gandhi : गुजरातच्या जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारतो,राहुल गांधी

Archana Banage

ऍमेझॉनने गाठला 10 लाख विक्रेत्यांचा टप्पा

Patil_p