Tarun Bharat

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीविरोधात काँग्रेसची राज्यव्यापी सायकल रॅली

Advertisements

प्रतिनिधी /बेंगळूर

पेट्रोल, डिझेल, गॅस आणि आवश्यक वस्तुंच्या दरवाढीविरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी राज्यव्यापी सायकल रॅली काढली. बेंगळूरसह राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुका केंद्रांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी केली.

प्रदेश काँग्रसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी उडुपीत तर विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या म्हैसूर येथे सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बेंगळूर उत्तर, दक्षिण आणि सेंट्रल तसेच बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ात जिल्हा काँग्रेस समितीचे पदाधिकारी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष रामलिंगारेड्डी यांच्या नेतृत्वाखाली रॅलीमध्ये सहभागी झाले होते. बेंगळूर शहर आणि ग्रामीण जिल्हय़ांमधील 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये सायकल रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला.

राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी ‘नॉटआऊट 100’ या नावाने आंदोलन सुरू केले आहे. याआधील राज्यातील 5 हजार पेट्रोल पंपांसमोर काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. आता सायकल रॅलीद्वारे केंद्र सरकारविरोधात आंदोलन केले आहे.

…अन्यथा तीव्र आंदोलन

बेंगळूरमध्ये प्रदेश काँग्रेस कार्यालयासमोर रॅलीला प्रारंभ झाल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत नंतर सुटका केली. पेट्रोल, डिझेल, गॅस आणि आवश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहेत. तरी देखील केंद्र सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. सरकारने दरवाढीवर नियंत्रण न आणल्यास आगामी काळात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा रामलिंगारेड्डी यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Related Stories

महसूल विभागाने आपत्ती योजना तयार केली: सरकारची हायकोर्टात माहिती

Archana Banage

एमआयटी-मनिपाल मधील ५९ जण कोरोनाबाधित

Archana Banage

चित्रपट अभिनेते सुदीप यांच्या उपस्थितीत इफ्फीचे उद्घाटन

Archana Banage

कर्नाटक: सिध्दरामय्यांकडून गोमांस आणि कोडवांवरील वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त

Archana Banage

ऑगस्टपासून निजद नेते विविध जिल्हय़ांच्या दौऱयावर

Amit Kulkarni

कत्ती, जोल्ले मंत्रिपदी कायम

Amit Kulkarni
error: Content is protected !!