Tarun Bharat

पेट्रोल-डिझेल दरवाढीचे मीटर सुरूच

१३ दिवसांत ११ वेळा दर वाढले

ऑनलाईन टीम/तरुण भारत

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. १३ दिवसांत ११ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. आज (रविवार) देखील हे दर ८० ते ८५ पैशांनी वाढले आहेत. आतापर्यंत ८ रुपयांनी इंधन दर वाढले आहेत.

भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीत इंधन दर ८० पैशांनी वाढले असून, पेट्रोल १०३.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली असुन त्यानुसार पेट्रोल ११८.४१ रुपये आणि डिझेल १०२.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

दरम्यान स्थानिक करांनुसार राज्यातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत निश्चित होते. देशातील दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि
चेन्नई या चार महानगरांची जर तुलना केली तर मुंबईत पेट्रोल-डिझेल सर्वाधिक महाग आहे.

Related Stories

संसदेत मांडणार 24 विधेयके

Patil_p

काश्मीरमध्ये चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

Patil_p

कणकवलीत राज ठाकरेंचे उत्स्फूर्त स्वागत

Anuja Kudatarkar

चरणजीत सिंग चन्नी पंजाबचे नवे ‘कॅप्टन’

Patil_p

सचिन वाझे माफीचा साक्षीदार ; कोर्टाकडून अर्ज मंजूर

Archana Banage

बेपत्ता सैनिकांचे मृतदेह सापडले; शहीद जवानांची संख्या नऊवर

Archana Banage