Tarun Bharat

पेट्रोल-डिझेल दराचा देशात भडका सुरूच

नवी दिल्ली

 देशात सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 30 तर डिझेलच्या दरात 36 पैशांनी वाढ झाली आहे. नव्या दरवाढीमुळे दिल्ली आणि मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर गेली आहे. मंगळवारपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रतिलिटर 95 रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमतीत आणखी वाढ झाल्यास पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 88.44 रुपये होती. तर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर 94.93 रुपयांवर पोहोचले आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर 89.73 रुपये तर चेन्नईमध्ये प्रतिलिटर 90.70 रुपये झाले आहे. त्याचबरोबर, डिझेल दिल्लीत शनिवारी 78.74 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात होते. मुंबईत डिझेलचा दर प्रतिलिटर 85.70 रुपये होता.

Related Stories

दहशतवाद रोखण्यासाठी ‘क्वाड’ सज्ज

Patil_p

विवेक राम चौधरी नवे हवाई दल प्रमुख

Amit Kulkarni

जगाच्या तुलनेत भारत सुस्थितीत

Patil_p

अदानी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात तिसरी याचिका

Patil_p

कुंभमेळय़ात 1700 जणांना कोरोनाबाधा

Amit Kulkarni

गुजरातमध्ये 11 घुसखोर ताब्यात

Patil_p
error: Content is protected !!