Tarun Bharat

पेट्रोल-डिझेल दरात किरकोळ कपात

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

सरकारी तेल कंपन्यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंधनाचे दर 20 पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले. या कपातीनंतर दिल्लीत 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.64 रुपये आणि डिझेलची किंमत 89.07 रुपये झाली आहे. गेल्या आठवडाभरात डिझेलच्या दरात झालेली ही चौथी दरकपात असून पेट्रोलच्या दरात गेल्या महिन्याभरात पहिल्यांदाच किरकोळ कपात झाली आहे. गेल्या आठवडाभरात डिझेल प्रतिलिटर 60 पैशांनी स्वस्त झाले आहे.

कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही इंधन दरात घसरण दिसून येत आहे. सध्या बेंट क्रूडने 4 महिन्यांचा नीचांक गाठल्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन कंपन्यांनी दरकपात केल्याचे दिसून येत आहे. सध्या देशभरातील सुमारे 19 राज्यांमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू काश्मीर आणि लडाख येथे पेट्रोल शंभरीपार पोहोचलेले आहे.

Related Stories

सलग दुसऱया दिवशीही पेट्रोल-डिझेलची दरवाढ

Patil_p

2022 पर्यंत 36 राफेल विमाने ताफ्यात

Patil_p

समुद्रातील प्लास्टिक कचऱ्यापासून ‘बार्बी’ तयार

Patil_p

हिमस्खलनापासून होणार जवानांचा बचाव!

Patil_p

विक्रमी! देशात 24 तासात 1.84 लाख बाधितांची नोंद

datta jadhav

अक्कलकोट-तोळणूर रोडवरील अपघातात एक ठार; सहाजण जखमी

Kalyani Amanagi