Tarun Bharat

पेट्रोल-डिझेल दरात वाढीचे सत्र थांबेना

प्रतिलिटर 25 ते 30 पैसे वाढ ः डिझेल काही राज्यांमध्ये ‘शंभरी’पार

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

देशात दिवसेंदिवस इंधन दरवाढीचे सत्र सुरुच आहे. सध्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी देशात आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गुरुवारनंतर सलग दुसऱया दिवशी म्हणजे शुक्रवारीही पेट्रोल प्रतिलिटर 25 पैशांनी आणि डिझेल 30 पैशांनी महाग झाले. सातत्याने होणाऱया या इंधन दरवाढीमुळे वाहनधारकांसह सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यापूर्वी मंगळवारी पेट्रोल 22 पैसे आणि डिझेल 75 पैसे प्रतिलिटरने महाग झाले होते. या दरवाढीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, ओडिशा, आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये डिझेलच्या दराने ‘शंभरी’पार झेप घेतली आहे.

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी पहाटे जारी केलेल्या सुधारित दरानंतर इंधन दरवाढीचा भडका सुरू असल्याचे दिसून आले. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत 25 पैशांनी वाढून 101.89 रुपये आणि डिझेल 30 पैशांनी वाढून 90.17 रुपये प्रत्नालिटरवर पोहोचले आहे. मुंबईत पेट्रोल 107.95 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचे दर 97.84 रुपये प्रतिलिटर इतके झाले आहे.

सर्वसामान्यांची होरपळ

नव्या दरवाढीमुळे ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पेट्रोलियम कंपन्यांच्या गॅस आणि इंधन दरवाढीमुळे गृहिणी आणि वाहनधारकांचे बजेट कोलमडणार आहे. घरगुती एलपीजीची किंमत गेल्या सात वर्षांत दुप्पट झाली आहे. 1 मार्च 2014 रोजी घरगुती गॅसची किरकोळ विक्री किंमत 410.50 रुपये प्रतिसिलिंडर (14.2 किलो) होती. हा दर आता ऑक्टोबर 2021 मध्ये जवळपास 900 रुपयांवर पोहोचल्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचे दर गेल्या सात वर्षात दुपटीहून अधिक वाढलेले दिसून येत आहेत. तसेच पेट्रोलपाठोपाठ आता डिझेलचे दरही ‘शंभरी’पार पोहोचल्यामुळे नजिकच्या काळात सर्वसामान्य लोकांची अधिक होरपळ होऊ शकते.

Related Stories

अशी ही नवी पिढी!

Patil_p

लोककलाकार मंजम्मा जोगती यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

Sumit Tambekar

मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करा; हिंदूत्ववादी संघटनांची मागणी

Abhijeet Shinde

काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन

Abhijeet Shinde

झारखंडमध्ये सामूहिक बलात्कारातील आरोपींना जमावाने जिवंत जाळले, एकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

”अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!