Tarun Bharat

पेट्रोल दरवाढीमुळे रिक्षावाल्यांचे गणित कोलमडले

प्रतिनिधी / बेळगाव

मागील काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेल दरवाढ मोठय़ा प्रमाणात झाली आहे. पेट्रोल प्रति लिटर 94 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. यामुळे पेट्रोलवर आधारलेल्या रिक्षाचालकांचा धंदा मेटाकुटीला आला आहे. इंधनाचे वाढलेले दर व मिळणारे भाडे याचे गणित जमत नसल्याने रिक्षाचालक हतबल झाले आहेत. यामुळे वाढलेल्या इंधनाचे दर कमी करण्याची मागणी रिक्षाचालक करीत आहेत.

कोरोनामुळे अनेक महिने बंद असलेला रिक्षा व्यवसाय आता कोठे हळुहळू पूर्वपदावर येत होता. त्यातच इंधन दरवाढीने व्यवसाय पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. बेळगाव शहरात पेट्रोलवर चालणाऱया रिक्षांबरोबरच सीएनजी रिक्षांचेही प्रमाण अधिक आहे. पेट्रोलचे दर महिन्याभरात 94 रुपयांपर्यंत पोहोचल्याने रिक्षाचालकांना काही प्रमाणात भाडे वाढवावे लागले आहे. परंतु तरीदेखील वाहनाचे हप्ते, इन्शुरन्स, गाडीचे मेंटेनन्स या सर्वांचा ताळमेळ बसत नसल्याचे रिक्षाचालक सांगत आहेत. लॉकडाऊनपूर्वी दररोज 1000 ते 1200 रुपये होणारा व्यवसाय आज 300 ते 400 रुपयांवर येऊन पोहोचला आहे. त्यात पोलिसांची मनमानी यामुळे नाहक दंड भरावा लागत आहे. यामुळेच अनेकांनी रिक्षा विकून इतर व्यवसाय सुरू केले आहेत. अनेकांनी सीएनजीवरील रिक्षा खरेदी केल्या आहेत. पेट्रोल दरवाढीमुळे हा व्यवसाय बंद करण्याची वेळ रिक्षाचालकांवर आली आहे. यामुळे वर्दीची रिक्षा, घरापर्यंत येणारा रिक्षावाला यापुढे जगेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमित गाडेकर – रिक्षाचालक

पेट्रोल 94 रुपयांवर पोहोचल्यामुळे मिळणारे भाडे व होणारा खर्च याचे गणित जुळता जुळत नाही. रिक्षाचे असणारे हप्ते व त्यात कोरोनामुळे कमी झालेली भाडी यामुळे रिक्षाचालक मेटाकुटीला आला आहे. अनेकांनी तर रिक्षा विकून दुसरा धंदाही सुरू केला आहे.

Related Stories

संगमेश्वरनगर परिसरातील विकासकामांना ब्रेक

Patil_p

भाजीपाल्याला योग्य हमीभावासाठी कायदा करा

Amit Kulkarni

बसथांब्यांवर वाढतोय निराधारांचा वावर

Amit Kulkarni

शहर परिसरात कार्तिकी एकादशी साजरी

Amit Kulkarni

पहिल्या रेल्वेगेट येथे दुरुस्तीचे काम

Omkar B

राज्योत्सव साध्या पद्धतीने

Patil_p