Tarun Bharat

पेठ वडगावची युवती अखेर कोरोना निगेटीव्ह

प्रतिनिधी / पेठ वडगाव

इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येवून कोरोना पॉझिटीव्ह झालेल्या वडगाव येथील मुलगीचा रिपोर्ट अखेर निगेटीव्ह आला. यामुळे वडगाव शहरातील नागरिकांनी अखेर निश्वास सोडला. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन कायम पाळून नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज असल्याचे मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी व्यक्त केली. 

पेठ वडगाव येथील युवती इस्लामपूर येथील नातेवाईकांच्या संपर्कात येवून कोरोना पॉझिटीव्ह आली होती. यामुळे वडगाव शहरात एकच खळबळ उडाली होती. पालिका व पोलीस प्रशासन दक्ष होवून शहरात विविध उपाययोजना करून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यंत्रणा रात्रदिवस राबत आहे. या पार्श्वभूमीवर आज या युवतीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. यामुळे वडगाव शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान आज पाळलेला लॉक डाऊन नागरिकांनी शंभर टक्के पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर विविध भागात पोलिसांनी मोटारसायकल चालकांना अडवून कारवाई केल्याने मोटारसायकलस्वारांची धावपळ उडाली.

Related Stories

शाहू समाधी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी सव्वा पाच कोटींची गरज

Archana Banage

कारागृहात स्पीड पोस्टमधून गांजा

Kalyani Amanagi

त्यांनी रेल्वे स्टेशनवर अनुभवली माणुसकी

Archana Banage

शिक्षक बँकेत आता 40 लाखांपर्यंत कर्ज

Archana Banage

नितीत गडकरींच्या पत्रावर प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले…

Tousif Mujawar

नरेंद्र मोदींचं स्वागत पाहून विरोधकांच्या पोटात दुखतंय-देवेंद्र फडणवीस

Archana Banage
error: Content is protected !!