Tarun Bharat

पेठ वडगावच्या बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाची निवड


पेठ वडगाव / प्रतिनिधी

पेठ वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीच्या अशासकीय प्रशासकीय मंडळाच्या मुख्य प्रशासक पदाचा ताबा चेतन संपतराव चव्हाण (सावर्डे, ता.हातकणंगले) यांनी  घेतला.दरम्यान महाआघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या जिल्ह्यातील नेतेमंडळीनी आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाची शिफारस करून त्यांची   वर्णी या बाजार समितीवर लागली. यामुळे अनेक वर्षांपासून असलेली बाजार समितीवरील आमदार महादेवराव महाडीक गटाच्या असलेल्या सत्तेला या निवडीमुळे पालकमंत्री सतेज पाटील,आमदार राजूबाबा आवळे यांनी धक्का दिला. या निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
           

येथील वडगांव शेती उत्पन्न बाजार समितीवरील जिल्ह्याचे नेते आमदार महादेवराव महाडीक यांची सत्ता होती. सत्तारूढ कार्यकरणीचा कार्यकाल संपल्याने समितीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत.  राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने पालकमंत्री सतेज पाटील व आमदार राजूबाबा आवळे यांनी महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांची प्रशासकीय मंडळावर वर्णी लागावी यासाठी सहकार खात्याचे मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे शिफारस केली होती.
        

दरम्यान वाढीव मुदत दिलेल्या सांगली, मिरजचा पॅटर्न कोल्हापूर जिल्ह्याला वापरावा यासाठी महाडिक गटाने न्यायालयीन दाद मागितली होती. यामुळे  पालकमंत्री पाटील यांच्या शिफारस केलेल्या प्रशासकीय कार्यकरणीच्या नेमणुकीला न्यायालयीन प्रक्रीयेमुळे ब्रेक लागला. यामुळे निवड प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने निवड व शिफारस झालेल्या कार्यकर्त्यात नाराजीचे वातावरण झाले होते.      गेल्या दोन महिन्यापासून नेत्यांनी लावलेली शक्ती, कार्यकर्त्यांमधील ईर्षा, न्यायालयीन अडथळे, यामुळे समितीच्या प्रशासकीय पदावर नेमणूक होणार की नाही अशा द्विधा मनस्थितीत नावाची शिफारस झालेल्या लोकांची झाली होती.   दरम्यान मंगळवारी निवडीबाबत संबंधित खात्याकडून  अधिकृत फॅक्स आल्याने बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार राजूबाबा आवळे कार्यकर्त्यासह  वडगाव बाजार समितीवर दाखल झाले.

बाजार समितीत उपस्थित असलेले प्रशासक प्रदीप मालेगावे यांनी मुख्य प्रशासकपदी चेतन चव्हाण यांची तर भैरवनाथ पोवार (खोची), सचिन कोळी (कुंभोज),रणजितसिंह यादव (पेठवडगाव),उत्तम पाटील ( शिरोली),नानासो गाठ (हुपरी),दशरथ पिष्ठे (कोरोची) मधुकर चव्हाण (खोची),गुंडा इरकर (हातकणंगले), फिरोज बागवान (पेठवडगाव), रावसो चौगुले (आळते), सुहास माने (किणी),महिपती पाटील( सैदाळ), श्रीधर पाटील (अतिग्रे), शशिकांत पाटील (लाटवडे), रमेश देसाई व प्रकाश जाधव (दोघे पट्टण कोडोली), अनिल जामदार (भादोले) यांची प्रशासकपदी निवड घोषित करण्यात आली.अधिकृत निवडीच्या घोषणे नंतर समितीच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी करून गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.या निवडीला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार प्रशासक फिरोज बागवान यांनी मानले.

Related Stories

कर्नाटक, केरळ, तामिळनाडू कोरोनाचे नवे हॉटस्पॉट

Archana Banage

कळंबा कारागृहातील मोबाईल कर्मचाऱयाकडून नष्ट; गुन्हा दाखल

Archana Banage

कोल्हापुरच्या ढाण्यावाघाला एक मंत्रिपद देऊन गप्प बसवलं-अजित पवार

Archana Banage

भटक्या कुत्र्यांच्या चाव्यात दोन बालके जखमी

Patil_p

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी जिल्हा परिषद सज्ज

Archana Banage

पुलाची शिरोलीत दूध विक्री बंद; मुलांचे हाल

Archana Banage