Tarun Bharat

पेठ वडगाव : अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर बंदोबस्ताचा ताण

प्रतिनिधी / पेठ वडगाव
पेठ वडगाव पोलीस ठाण्याची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीसाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बावीस गावात पोलीस बंदोबस्त देताना वडगाव पोलिसांची मोठी दमछाक होत आहे. कोरोनाच्या धोक्यातही विविध ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवून आपली लावून विविध दक्षता घेत पोलीस निरीक्षक प्रदीप काळे पोलीस प्रशासनाची कामगिरी चोखपणे बजावत आहेत.
पेठ वडगाव शहरात शहराच्या बाजुने सात नाके इतर एकवीस गावे आणि तीन जिल्हा बाँड्री  निलेवाडी पूल, शिगांव पूल, खोची उदगांव पूल आणि अकरा आंतरराज्यीय हायवे नाका-किणी टोलनाका व गुरूकुल तासगांव आणि अशोकराव माने कॉलेज  वाठार असे दोन काँरंटाईन सेंटर आहेत. याचबरोबर कोरोनाचा संसर्ग जिल्हयात येऊ नये म्हणुन व प्रत्येक गांवात कर्फ्यूचे नियम पाळले जावेत यासाठी तसेच किणी  टोल नाक्यावर अॅम्बुलन्स, दुधाचे टँकर, मुंबई पुणे येथुन जिल्हयात  प्रवासी घेऊन आलेल्या खाजगी व टॅक्सी चालकांना ताब्यात्त घ्यावे लागते. या चालकांची यादी किणी टोल नाक्यावर तयार करून जिल्हयातील त्या त्या पोलीस ठाण्याला पाठवून दिल्याने अशा जवळपास १६३ वाहनांवर जिल्ह्यात कारवाई होऊन ती जप्त करण्यात आली तसेच  पायी जाणारे इसम यांचे वर कारवाई केल्यामुळे किणी टोल नाक्यावरून कोल्हापूर जिल्हयात येणारा प्रचंड लोंढा आता आटोक्यात आला.

वडगाव पोलीस ठाण्याकडे पोलीस ठाण्याकडे दैनदिन ३८ कर्मचारी तसेच १८ अशा एकूण ५६ लोकावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व नाके , सेंटर व पो.स्टे. चे दैनंदिन कामकाज हे दिवस रात्र चालु आहे. ५६ पैकी १४ वडगांव शहरासाठी म्हणजे २५ टक्के  मनुष्यबळ तर एकटया वडगांव साठीच जात आहे. यानंतर पोलीस ठाण्याच्या बाकीच्या २१ गांवांचे काय करायचे हा प्रश्न आहेच. वडगाव पोलिसांना वडगाव शहरासह इतरही गावात बंदोबस्त द्यावयाचा असतो. यामुळे पोलिस ठाण्याची तारेवरची कसरत सुरु असून कामाचा प्रचंड ताण वाढला असल्याचे चित्र आहे.

Advertisements

वडगाव शहरात गेल्या आठवड्यात कोरोनाची एक पॉझिटीव्ह केस आढळली त्यावेळी वडगांव पोलिसांनी रात्रभर काम करून त्या केसची  सर्व साखळी मोडण्यासाठी अत्यंत कडक बंदोबस्त ठेवला होता विनाकारण रस्त्यावर येणार्यांना लाठीचा प्रसादही दिला. प्रशासनाला यामुळे  पुढील सर्व लोक काँरंटाईन मध्ये तात्काळ पाठविणे व त्यांचे वर उपचार करणे शक्य झाले आणि पुढे ते सर्व लोक निगेटिव्ह आले. यामुळे कोरोनाची साखळी वडगाव पोलिसांची मोडण्यासाठी मोठी मदत झाली. सध्या विविध पातळीवर पोलीस प्रशासनाचे काम प्रचंड वाढले आहे. आपला जीव धोक्यात घालून पोलीस प्रशासन तारेवरची कसरत करत आपली सेवा बजावत असल्याचे चित्र आहे. यामुळे वडगाव पोलीस ठाण्याला आता जादा पोलीस स्टाफ मिळावा तसेच वडगाव पालिकेने वडगाव शहरासाठी होमगार्ड बंदोबस्त घेतल्यास पोलीसावरील हा ताण कमी येण्यास मदत होणार आहे.
वडगावसाठी शासनाकडून होमगार्ड मागविणार : मुख्याधिकारी शिंदे  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना व दक्षताबाबत बैठक घेण्यात आली होती. यावेळी वडगाव शहरात बंदोबस्तासाठी होमगार्ड मागव्ण्याबाबत चर्चा झाली. यानुसार बैठकीत पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी याबाबत माहिती दिली आहे . यामूळे पोलीस प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

Related Stories

महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींसाठी धनंजय मुंडेंचे दोन दिलासादायक निर्णय

Rohan_P

कोल्हापुरात कोरोनामुळे एकाचा मृत्यू; 4 जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

विटा नगरपालिकेत कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

इंधन दरवाढीवर सरसकट केंद्राकडे बोट दाखवू नये – चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

सीनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत उचगावच्या अनिता पाटीलांना चार सुवर्ण

Abhijeet Shinde

हातकणंगले काँग्रेसतर्फे इंधन दरवाढीबाबत तहसीलदारांना निवेदन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!