Tarun Bharat

पेठ वडगाव परिसरात स्वाभिमानीच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

पेठ वडगाव/प्रतिनिधी

संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा, स्वामिनाथन आयोगाच्या अंमलबजावणी व अन्य विविध मागण्यासाठी आज पेठ वडगाव परिसरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मागणीसाठी वाठारकोडोली रस्त्यावर रास्ता रोको करण्यात येवून शासनाकडे असलेल्या मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत निशाणदार यांचेकडे देण्यात आले. स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

या बंदला व्यापारीव्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तर वडगाव शहरात खाजगी व एस.टी.बस वाहतूक बंद होती. तर विविध मागण्यासाठी अनेक शाळा महाविद्यालये, बँका, शासकीय कार्यालये, बंद होती. यामुळे शहरात सगळीकडे शुकशुकाट होता. या बंदमुळे लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली.

वाठार येथे शेतकरी संघटनेने वाठारकोडोली रस्त्यावर रास्ता रोको करून आपल्या मागण्याकडे लक्ष वेधले. या आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. शेतकर्याचा सातबारा करावा व अन्य विविध मागण्याचे निवेदन पोलीस प्रशासनाकडे देण्यात आले. वडगाव पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रशांत निशाणदार यांनी निवेदन स्वीकारले यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार न घडता बंद शांततेत पार पडला.

यावेळी आप्पासो येडके,सत्वशील जाधव, संपतराव पवार, हरिभाऊ जाधव, सुधीर मगदूम, महेश पांडव, शिवाजी आंबेकर, तानाजी मोरे, उमेश पाटील, आण्णा मगदूम, सदाशिव बोनेपाटील, सुरेश पाटील, शंकर पाटील, पिंटू पाटील, महावीर पाटील यांचेसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

Women’s Day Special : उंच कडा आणि त्याच उंचीची जिद्द, दोघींनी फक्त दोराच्या सहाय्याने चढला अजस्त्र कडा

Archana Banage

‘आरोग्य अभियाना’त कोल्हापूर महापालिका राज्यात दुसरी

Archana Banage

सेनापती कापशीतील खासगी तरुण डॉक्टरांचा कोरोनाने मृत्यू

Archana Banage

ग्रामपंचायत उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादा वाढवल्या

Kalyani Amanagi

सर्वसामान्यांची एसटीसेवा मोडण्याचा डाव

Abhijeet Khandekar

महाभारत तुम्ही, तर आम्ही रामायण घडवणारी मंडळी, सतेज पाटलांचा पलटवार

Archana Banage
error: Content is protected !!