Tarun Bharat

पेठ वडगाव पोलिसांकडून मोटरसायकल चोरट्यास अटक

दोन मोटरसायकली हस्तगत

पेठ वडगाव / प्रतिनिधी

मोटरसायकल चोरी करणारा दीपक तुकाराम वाघमारे (वय ३२ ,रा टाकळे वसाहत, चिकूर्डे ता वाळवा, जि. सांगली) याला वडगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली. सराईत चोरट्याकडून दोन मोटरसायकल पोलिसांनी हस्तगत केल्या.

या बाबत पोलिसातून घेतलेली माहिती अशी की, वाठार तर्फ वडगाव येथील ब्रिज खाली लावण्यात आलेली सुनील जाधव यांची मोटरसायकल चोरी झाली. तर बुवाचे वाठार येथील एका घरासमोरून मोटरसायकल चोरीस गेली होती. या मोटरसायकल चोरी अज्ञातांनी केल्याची फिर्याद वडगाव पोलीस ठाण्यात झाली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, कोल्हापूर अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, गडहिंग्लज कॅम्प अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, डीवायएसपी रामेश्वर वैंजने, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दीपक पोळ, पोलीस अंमलदार दादा माने,पोलीस कॉन्स्टेबल योगेश राक्षे, संदीप गायकवाड, प्रमोद चव्हाण या पथकाने संशयितरित्या फिरत असलेला दीपक वाघमारे याला ताब्यात घेतले.

या चोरट्याकडे कसून चौकशी केली असता त्याने वाठार व बुवाचे वाठार येथील मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन मोटरसायकली जप्त करण्यात आले असून अधिक तपास पोलीस फौजदार दीपक पोळ करीत आहेत.

Related Stories

महाराष्ट्र : 3,729 नवे कोरोनाबाधित; 72 मृत्यू

Tousif Mujawar

एक हजाराची लाच स्वीकारताना शिक्षण विभागाच्या क्लार्कसह तिघे गजाआड

Archana Banage

बिग बॉस सिझन १६ मध्ये राज कुंद्रा स्पर्धक बनून येणार

Archana Banage

नितेश राणेंच्या टीकेला भास्कर जाधव यांचे प्रत्युत्तर ; म्हणाले, ”मी फडतूस माणसाबद्दल बोलत नाही”

Archana Banage

बुधगावच्या नवीन पाणी योजनेची यशस्वी चाचणी

Archana Banage

तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही ; प्रीतम मुंडेंच्या पंकजांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

Archana Banage