Tarun Bharat

पेठ वडगाव पोलिसांची मटका घेणाऱ्यावर कारवाई, चारजणांवर गुन्हा

Advertisements

पेठ वडगाव / प्रतिनिधी :

सावर्डे व वाठार तर्फ वडगाव (ता.हातकणंगले) येथे चोरी छुपे मटका घेणार्या चार जणावर वडगाव पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत रोख रक्कम व व मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अशा पद्धतीने असलेल्या अवैध धंदे सुरु दिसल्यास नागरिकांनी वडगाव पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून अशा प्रकारचे अवैध व्यवसाय उधळून लावू अशी माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिली.

याबाबत पोलीसातून घेतलेली माहिती अशी की, सावर्डे येथे राजाराम नामदेव वड्ड हा आराध्या अग्रो एजन्सी नावाच्या टपरीत इरफान हजरत (रा. शिगाव, ता.वाळवा, जि.सांगली) व मनोज थोरात, दत्ता माळवदे (रा, इचलकरंजी) यांच्यासाठी कल्याण मटका घेत होता. याची माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे वडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागास मिळाली. असता या ठिकाणी सापळा रचून राजाराम वड्ड यास रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम व मटका घेण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून राजाराम वड्ड यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच बरोबर वाठार तर्फ वडगाव येथे विशाल भिमराव कुभार (रा.वाठार) यालाही वाठार येथे मराठी शाळेमागे मटका घेताना वडगाव पोलिसांच्या पथकाने कारवाई करून रोख रक्कम व मटक्याचे साहित्य जप्त करून विशाल कुंभार यास ताब्यात घेवून अटकेची कारवाई केली. या प्रकरणी चार जणावर कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी आवाहन केले आहे की, वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठेही मटका, जुगार अवैध व्यवसाय सुरु असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यास पोलिसांना याची माहिती द्यावी. माहिती देणार्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल व अशा अवैध व्यावसाईकांच्या मुसक्या आवळल्या जातील. या पूर्वी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मटका तसेच अवैध व्यवसाय नष्ट करण्याचा पाडलेला पायंडा यापुढे कायम ठेवला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी दिली.

Related Stories

प्राथमिक शिक्षक बँक निवडणूकीत ‘डाव-प्रतिडाव’

Kalyani Amanagi

कोडोलीत अनावश्यक फिरणाऱ्यांची अॅन्टीजेन तपासणी, एक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्ह्यात 98 हजार 800 प्रतिबंधक डोस

Abhijeet Shinde

परिस्थितीवर मात करून नेहा बनली मिस्त्री

Abhijeet Shinde

कोल्हापूर : वीज अंगावर पडून महिला जागीच ठार, एक गंभीर जखमी

Abhijeet Shinde

रायगडवर खडा पहारा देणाऱ्या पहिल्या तुकडीतील धारकऱ्यांचा शपथविधी उत्साहात पार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!