Tarun Bharat

पेठ वडगाव विकास आराखड्या रद्दच्या मागणीसाठी कडकडीत बंद

व्यापारी, व्यावसाईकांचा बंदला उत्स्फूर्त पाठींबा

Advertisements

पेठ वडगाव / प्रतिनिधी

पेठ वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या आराखड्यात पडलेली जमिनीवरील आरक्षणे व दाखविण्यात आलेले रस्ते यामध्ये अनेक गंभीर त्रुटी असल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. यामुळे शहरातील अनेक शेतकरी, नागरीक, व्यापारी यांचे नुकसान होणार आहे. हा अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा पालिकेने व प्रशासनाने रद्द करावा. या मागणीसाठी विकास आराखडा विरोधी नागरी कृती समिती वडगाव यांनी बुधवार दि.१९ रोजी पेठ वडगाव बंद पुकारला होता. हा वडगाव शहरातील नागरिक, व्यापारी, व्यावसाईक यांनी बंद शंभर टक्के पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

पेठ वडगाव पालिकेने नुकताच वडगाव शहराचा प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला आहे. या आराखड्यात अनेक गंभीर त्रुटी असून अन्यायकारक आराखड्याबाबत अनेक नागरीकांच्या तक्रारी आहेत. या आराखड्यातील आरक्षणामुळे अनेक शेतकरी, नागरिक, व्यापारी यांच्या शेतजमिनी, एन.ए.प्लॉट, घरे, धार्मिक स्थळे, विहिरी, बोअरवेल आदी विविध ठिकाणी चुकीची आरक्षणे टाकली आहेत. या चुकीच्या आरक्षणामुळे शेतीला पाणी मिळणे दुरापास्त होणार आहे. या बाबीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. तसेच काहीजण भूमिहीन तर काहीजणांची राहती घरे बाधित होत आहेत. या शिवाय वडगाव शहरात धरण ग्रस्त लोकांना शेती व राहण्यासाठी शासनाने जमिनी दिल्या आहेत असे असताना त्यांच्याही जमिनी-घरे या आराखड्यात बाधित होत आहेत. त्यामुळे अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा पालिका प्रशासनाने रद्द करावा या मागणीसाठी बुधवार दि.१९ जानेवारी रोजी विकास आराखडा विरोधी नागरी कृती समिती वडगाव यांनी वडगाव बंद पुकारला आहे. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. नागरिकांनी बंद शांततेत पाळावा असे आवाहन कृती समितीने केले होते.
या बंदला वडगाव शहरातील व्यापारी, व्यावसाईकानी सर्व व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद शहरात कडकडीत बंद पाळला. अत्यावश्यक सेवा वगळून करण्यात आलेल्या हा बंद यशस्वी झाला. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी पालिका चौकासह शहरातील विविध चौकात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. बंद शांततेत पार पडला. प्रशासनाने हा अन्यायकारक प्रारूप विकास आराखडा रद्द करावा अशी मागणी यावेळी विकास आराखडा नागरी कृती समितीने केली.

यावेळी माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. अशोक चौगुले, नगरसेवक व शिवसेना वडगाव शहर प्रमुख संदीप पाटील, नगरसेवक गुरुप्रसाद यादव, जवाहर सलगर, संगीता मिरजकर, कॉंग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष जगन्नाथ माने, आण्णासो तायशेटी, शितल कोळी, सुनिल कदम, मिलिंद सनदी, आदिलशहा फकीर, संदीप उंडाळे, मियालाल पटवेगार, अजित पाटील, आनंदराव म्हेत्रस, जयकुमार गणपते, कमलेश शिरवडेकर,रमेश दाभाडे, राजकुमार मिठारी, विकासराव कांबळे, रणजीतसिंह पाटील, आदीसह विकास आराखडा विरोधी नागरी कृती समितीचे सदस्य, व्यापारी, व्यावसाईक, नागरिक उपस्थित होते.

Related Stories

‘स्वराज्य’चे तोरण आणि धोरण उद्या ठरणार?

Kalyani Amanagi

नेसरीत पहिल्याच वर्षी दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद

Archana Banage

”गुन्हेगार माझे होर्डिंग्स लावत असतील तर यात माझा काय दोष”

Archana Banage

शिक्षक मतदारसंघात तांत्रिक दोषामुळे १० हजार पदवीधरांची नोंद

Archana Banage

प्रशांत किशोरांनी मुख्यमंत्री अमरिंदर सिंगांचे सल्लागार पद सोडलं

Archana Banage

गुजरातच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबत आज होणार निर्णय?

datta jadhav
error: Content is protected !!