Tarun Bharat

पेडणेतील ‘ती’ शौचालये स्थलांतरीत की चोरी?

Advertisements

सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची नागरिकांची मागणी

प्रतिनिधी  /पेडणे

पेडणे बाजारपेठेत दोन वर्षापूर्वी सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे फ्ढायबरची तीन शौचालये उभारण्यात आली होती. बूधवार दि. 23 फ्sढबुवारी 2022 रोजी दुपारी अचानक कुणालाही कल्पना न देता कामागारांच्या सहाय्याने तीनही शौचालये काढून नेण्यात आली. ही शौचालये नेमकी कोणी आणि का नेली, ती कुठे स्थलांतरीत केली की त्यांची चोरी झाली याबाबत पेडणेत उलाटसुलट चर्चा सुरु आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी  पेडणे तालुका बहुजन समाजाचे अध्यक्ष उमेश तळवणेकर, ज्ये÷ नागरिक गोपिचंद आपुले, सूर्यकांत चोडणकर व पेडणेतील नागरिकांनी केली आहे.

पेडणे पालिका क्षेत्रातील बाजारपेठेत दोन वर्षापूर्वी उपमुख्यमंत्री तथा पर्यटनमंत्री मनोहर उफ्&ढ बाबू आजगावकर यांच्या प्रयत्नाने गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन या योजनेखाली तीन शौचालये उभारण्यात आली होती.  यावर सुमारे एक कोटी रुपये खर्च झाल्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आपल्या भाषणात नेहमीच सांगत होते. या शौचालयांचे उद्घाटनही आजगावकर यांच्या हस्ते झाले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर ही तीनही शौचालये बंदच होती.  त्यावर बरीच चर्चा होऊन याबाबत वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियातून वृत्त प्रसिध्द होऊन टीका झाली होती.  पेडणे बाजारात मध्यवर्ती ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने ही शौचालये उभारण्यात आली होती, असे उमेश तळवणेकर म्हणाले.

 पालिका अनभिज्ञ : नगराध्यक्ष

पेडणे पालिका क्षेत्रातील बाजारपेठेत उभारण्यात आलेले फ्ढायबरची ही शौचालये अचानक बुधवारी काढून नेण्यात आली. याबाबत  पेडणे नगराध्यक्षांना विचारले असता, पेडणे पालिकेला याबाबत कोणीही कळविले नसल्याचे नगराध्यक्ष उषा नागवेकर यांनी सांगितले.

सखोल चौकशी कराः तळवणेकर

पेडणे बाजारपेठेत सुमारे एक कोटी रुपये खर्चा करुन उभारलेली फ्ढायबरची शौचालये ही सरकारी पैसा खर्च करुन आणली होती.  निवडणूक आजारसंहिता सुरु असताना ही शौचालये कोणीतरी चोरुन नेले असणार. नाहीतर ही शौचालये दुसारीकडे उभारून त्यावर पुन्हा एकदा एक कोटी रुपये खर्च दाखविण्याचा डाव असू शकतो.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी उमेश तळवणेकर यांनी केली आहे.

लोकांची गैरसोयः गोपिचंद आपुले

पेडणे बाजारपेठेत उभारलेली फ्ढायबरची ही शौचालये कोणी नेली,  लोकांची गैरसोय होत होती म्हणून ही शौचालये उभारली होती. याबाबत पेडणे पालिका, मामलेदार, उपजिल्हाधिकारी यांना माहिती आहे की नाही? ही शौचालये  काढल्याने लोकांची गैरसोय होत आहे, असे गोपिचंद आपुले यांनी सांगितले.

स्थलांतरासाठी साडेचार लाख ?

पेडणे बाजारपेठेतील ‘ती’ शौचालये बुधवारी पेन आणून ट्रकवर घालून दुसऱया ठिकाणी स्थलांतर करण्यात आली. ती कुठे नेण्यात आली हे कळले नाही. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही शौचालये काढून दुसरीकडे नेण्यात आली. ती शौचालये स्थलांतरीत करण्यासाठी रु.4,49, 734/- रुपये घेतले असल्याचे अजित रामदास नाईक या ठेकेदाराने सांगितले.

Related Stories

पक्ष प्रवेश कार्यक्रमास परवानगी नाकारल्याचे खापर आपल्यावर फोडू नये

Omkar B

मुंबईचे आमदार आणि गोव्याचे सुपूत्र प्रकाश फातर्पेकर यांचा सत्कार

Patil_p

सासष्टीतही उघड लँडमाफियांचे कारनामे

Omkar B

मडगावात धावत्या कारला आग

Omkar B

भाजपाने मंत्र्याच्या ज्येष्ठता यादीतून आपला खरा चेहरा

Amit Kulkarni

प्रेंड्स ऑफ टॅक्सी असोसिएशनचे धरणे आंदोलन स्थगित

Amit Kulkarni
error: Content is protected !!