Tarun Bharat

पेडणेत होणाऱया गोमंतक मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा मुलांमध्ये रुजवूया : दिपश्री सोपटे

प्रतिनिधी / पेडणे

पेडणेत होणारे मराठी साहित्य  संमेलन यशस्वी करावे. मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे. ती गोड मनमोहक असल्याने त्यांच्या प्रेमात पडतो . मराठीची  साहित्य सेवा अश्या संमेलनातून होणार आहे . गोमंतक भूमितील संमेलन आमच्या पेडणेत होते हे आमचे भाग्य असून  या  पेडणेतील संमेलनातून मराठी भाषा मुलांमध्ये रुजवूया ती दूर चालली आहे तिला जवळ आणून मराठीचा गोडवा त्यांना देऊया असे आवाहन प्रमुख पाहुण्या दिपश्री सोपटे यांनी पेडणे येथे  7  रोजी 28  व्या   साहित्य संमेलन कार्यलयाचे उदघाटन केल्यानंतर केले.

यावेळी व्यासपीठावर  चित्रा क्षीरसागर ,अध्यक्ष रमेश वंसकर ,कार्याध्यक्ष राजमोहन शेटय़? , उत्तम कोटकर ,कार्यवाह विठ्ठल गावस ,सुहास बेळेकर ,चंद्रकांत सांगळे  आदी उपस्थित होते

साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर यांनी बोलताना  कोरोनामुळे हे बारगळलेले संमेलन पेडणेकरानी ऊर्जा दिली म्हणून हे संमेलन होत आहे .भगवती हायस्कुलने प्रेरणा घेऊन आम्ही पुढे आलो , हे संमेलन यशस्वी करूया , आमदार दयानंद सोपटे यांनी भरघोस निधी देण्याचे जाहीर केले आहे असे सांगून मराठीची पताका आम्हाला पुढे न्यायची आहे . एप्रिल मध्ये संमेलन आयोजित करण्यात येणार आहे . आम्हाला राजकारण करायचे नाही. आम्हाला मराठीची सेवा करावी लागेल . महिला ,विद्यार्थी  ,पत्रकार यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

नाविन्यपूर्ण संमेलन करूया ते घडवण्यासाठी एकत्रित येऊया .महाराष्ट्रातील दिग्गज साहित्यकि  या संमेलनाला येणार आहे .पैसा नसतानाही कार्यक्रम हे मराठीप्रेमींच्या जीवावर यशस्वी होतात . कीर्तनकाराना स्थान देण्याची संकल्पना आहे . ही भूमी पवित्र आहे त्यातूनच पत्रकासर लेखक साहित्यकि तयार व्हावे असे त्यांनी म्हटले .किशोर किनळेकर यांनी स्वागत केले .

राजमोहन शेटय़? यांनी प्रास्तविक  करताना साहित्य मराठी प्रेमींनी हा झेंडा फडकवण्यासाठी या संमेलनाची गरज आहे .ही चळवळ गावागावात चालू केली जात आहेत ,साहित्याची सेवा करण्यासाठी हे संमेलन यशस्वी करूया असे आवाहन केले .साहित्याच्या चळवळीतून मजल मारावी यासाठी आयोजन केले जात आहे .साहित्याचा रथ आम्ही ओढवूया . प्रत्येकाने योगदान द्यावे .असे आवाहन केले .

 प्रमुख पाहुण्या दिपश्री सोपटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यलयाचे उद्घाटन करण्यात आले.

Related Stories

एकाच कुटुंबातील तिघांची गळफासाने आत्महत्या

Amit Kulkarni

कला- संस्कृती खात्याचे युवा सृजन पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni

येत्या जूनपासून योगाभ्यास अनिवार्य

Amit Kulkarni

डिचोलीत लॉकडाऊनची कडक व यशस्वी अंमलबजावणी.

Amit Kulkarni

‘अच्छे दिन’ च्या नावाखाली भाजपकडून जनतेची लूट

Patil_p

विनोद सतकळकर यांना यंदाचा कौशल्यचार्य पुरस्कार जाहीर

Amit Kulkarni