Tarun Bharat

पेडणे तालुक्मयालाही चक्रीवादळाचा तडाखा

शनिवारी रात्रीपासून जोरदार वाऱयासह मुसळधार पाऊस, : झाडे पडून लाखो रुपयांची हानी, वीज पुरवठा खंडित

प्रतिनिधी / पेडणे

पेडणे तालुक्मयालाही समुद्र किनारी भागात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला. शनिवारी रात्री जोरदार वाऱयासह सुरु झालेला मुसळधार पाऊस रविवारी रात्रीपर्यंत पडत होता. तुफानी वाऱयामुळे पेडणे तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात झाडे पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. रविवारी पहाटेपासूनच खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. वीज वाहिन्यावर झाडे पडल्याने अग्निशामक दलाला बरीच कसरत करावी लागली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कुळागारातील पोफळी व अन्य झाडे पडल्याने मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. पेडणे तालुक्मयातील जनजीवन विस्कळीत झाले. लोकांनी घरा बाहेर पडणे टाळले.

     पेडणे तालुक्मयात जनजीवन झाले विस्कळीत

 रविवारी सकाळपासून सुसाट वेगाने वारे वाहू लागले व त्याचबरोबर मुसळधार पाऊस पडल्याने पेडणे तालुक्मयात जनजीवन विस्कळीत झाले. वादळी वाऱयामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. पूर्व मोसमी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्याने नुकसान झाले. सकाळ पासून तालुक्मयात जोरदार वाऱयासह मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता आले नाही.

 पेडणे तालुक्मयालाही बसला तौक्ते वादळाचा बसला फटका

 हरमल, मोरजी, मांदे, केरी या भागातील नागरिकांना समुद्र पाण्याची पातळी वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणात फटका बसला. किनारी भागातील शॅक्स, हॉटेल्सचे साहित्य, तयार केलेली कुटीरे मोडून पडली तसेच पाण्याची पातळी वाढल्याने समुद्र किनारी भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आनेक घरात तसेच किनारी भागातील, हॉटेल्समध्ये घुसले पाणी.

  तेरेखोल नदीला पूर, नदी किनारी भागात पुरसदृश्य स्थिती

तेरेखोल नदी केरी येथे समुद्राला जोडली गेली आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने तेरेखोल नदी किनारी भागातील बागायत, पराष्टे, कोनाडी, देवसू मानशी भालखाजन या भागात पाण्याची पातळी वाढल्याने नागरिक भयभीत झाले.  शेत मळय़ात पाणी भरले. त्यामुळे शेतीचे मळात पाणी भरल्याने पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली.

   अनेक ठिकाणी झाडांची पडझड, अग्निशामक दलाची दमछाक

शनिवारी रात्री तसेच रविवारी पूर्ण दिवसभर वाहिलेल्या वेगवान वाऱयामुळे अनेक ठिकाणी झाडे मोडून तसेच उन्मळून पडली. ही झाडे कापून बाजूला करण्यासाठी पेडणे अग्निशामक दलाला बरेच परिश्रम घ्यावे लागले. जोरदार पावसाताही पेडणे अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच जवानानी पावसात भिजत झाडे कापून बाजूला केली. दिवसभर सतत पेडणे अग्निशामक दलाला झाडे पडल्याचे कॉल आल्याने झाडे बाजूला करताना त्यांची बरीच दमछाक झाली. रविवारी दिवसभर तालुक्मयात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

रविवारी पहाटेपासूनच काही गावातील वीज पुरवाठा खंडित झाला. तर सकाळी आठच्या दरम्यान बहुतेक तालुक्मयात सर्व गावात तसेच पालिका क्षेत्रातही बत्ती गुल झाली. त्यामुळे घरात स्वयंपाक करणाऱया महिलांचे बरेच हाल झाले रविवार असल्याने बहुतेक सर्व कर्मचारी तसेच आरोग्य तसेच पोलीस खाते वगळता घरात राहिले. पावसाने सकाळपासूनच रौद्ररुप धारण केल्याने नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे  टाळले.

Related Stories

युवकाच्या मृत्यूप्रकरणी निर्दोष

Amit Kulkarni

काणका मुख्य रस्त्यावरील बेकायदेशीर 7 दुकाने जमीनदोस्त

Amit Kulkarni

आमोणेत दुचाकी-टेम्पोची धडक

Patil_p

फार्तपा पंचायतीतून पहिल्या दिवशी दोन अर्ज

Amit Kulkarni

आयआयटीमुळे गुळेली जागतिक नकाशावर झळकणार

Omkar B

गुजरातेत भाजपचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ विजय

Amit Kulkarni