प्रतिनिधी/पेडणे


पेडणे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 11 दिवशीय गणपतीचे गांधीतीर येथे तेरेखोल नदी पत्रात थाटात विसर्जन करण्यात आले.यंदा कोरोनाचे सावट असल्याने दि?डी तसेच भव्य कार्यक्रमांचे तसेच मोठे कार्यक्रम मंडळाने आयोजित न करता अत्यंत साध्या पद्धतीने यंदाचा उत्सव साजरा केला. ट्रस्टचे अध्यक्ष परशुराम कोटकर , उपाध्यक्ष मधुकर जयराम पालयेकर, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण कोटकर , उपाध्यक्ष सुभाष कोरगावकर , राजन नाईक, सचिव चंदन सातार्डेकर , खजिनदार संदेश सावळ देसाई, आनंद सावळदेसाई, हरिश्चंद्र नागवेकर , आना कवठणकर, अरुण पालयेकर , कृष्णा पालयेकर ,अभय कामुलकर, नितीन च्यारी, आदी पदाधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला उत्तर पूजा तसेच आरती व सार्वजनिक गा-हाणेघालण्यात आले
मिरवणूकीने गांधीतीर खारेबांध येथे तेरेखोल नदीपाञाकडे मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते.यावेळी आरती करण्यात आली.मधुकर पालयेकर यांनी गणपती बाप्पाने सर्वांना चांगली बुद्धी द्यावी आणि असाच ऐकोपा नांदावा असे आवाहन न केले.
ड़ पेडणे पोलीस स्थानकातील गणपतीचे मिरवणूक काढून गांधीतीर येथे विसर्जन केले.यावेळी पेडणे पोलीस निरीक्षक जीवबा दळवी , उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी , उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, उपनिरीक्षक हरिश वायंगणकर , उपनिरीक्षक विवेक हळर्णकर , वाहतूक पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.