Tarun Bharat

पेपरफ्राय स्पर्धेसाठी तयार

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

देशातील सर्वात मोठी ऑनलाईन फर्निचर विक्री कंपनी पेपरफ्राय सध्या कोरोनाशी दोन हात करत व्यवसाय सुधारण्यावर भर देत आहे. बिगर मेट्रो शहरात वाढलेली फर्निचरची मागणी लक्षात घेऊन कंपनी येणाऱया काळात व्यवसाय विस्तारावर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठीची नियोजित योजना कंपनीने तयार केली आहे.

या कंपनीची मोठी स्पर्धक कंपनी अर्बन लॅडरचे नुकतेच रिलायन्स रिटेलकडून अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे पेपरफ्रायला या कंपनीशी तगडी स्पर्धा करावी लागणार आहे. पेपरफ्रायचे संस्थापक व सीईओ अंबरीश मूर्ती यांच्या मते, प्रतिस्पर्धी व्यवसायात असणं कधीही चांगलं असतं. रिलायन्सनेही आता या व्यवसायात उडी घेतली आहे. त्यांचे या व्यवसायात स्वागतच आहे. दुसरीकडे पेपरफ्रायला स्वीडनमधील फर्निचर रिटेल कंपनी आयकीया यांच्याशी स्पर्धा करावी लागते आहे. अनेक आव्हाने असली तरी येणाऱया काळात व्यवसाय विस्ताराचे लक्ष साध्य करण्यावरच कंपनीचे लक्ष असणार असल्याचे मूर्ती यांनी बोलून दाखवले.

Related Stories

पेट्रोनेटचा नफा तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढला

Patil_p

एफडीच्या व्याजदरात पीएनबीकडून बदल

Amit Kulkarni

स्टार्टअप मीशोला ग्राहकांचा दमदार प्रतिसाद

Patil_p

अदानी पॉवरचा समभाग चमकला

Patil_p

ऑनलाईन वाहन बुकिंगकडे वाढता कल

Patil_p

उत्तर पश्चिम रेल्वेचा विक्रम

Amit Kulkarni