Tarun Bharat

पेरणीपूर्व मशागतीला आला वेग

शेतातील कामे आटोपण्यासाठी बळीराजाची शिवारात वर्दळ

प्रतिनिधी / बेळगाव

मागील काही दिवसांपासून तालुक्मयाला वळीव पावसाने झोडपले. त्यामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस झाल्याने मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कमी झाल्याने शेतकरी मशागतीच्या कामात गुंतला आहे. काही शिवारात जास्त ओलावा असल्याने मशागतीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे.

पश्चिम भागातील बेळगुंदी, बाकनूर, बेळवट्टी, बडस, बिजगर्णी, कावळेवाडी उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, कुदेमनी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ आदी भागातील शिवारात बळीराजाची वर्दळ वाढली आहे. मे अखेरच्या आठवडय़ात धुळवाफ पेरणीला सुरुवात होते. काही शेतकरी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधून पेरणीला सुरुवात करतात. एप्रिल महिन्यापासून अधून-मधून पाऊस होत असल्याने मशागतीला पूरक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नांगरणी, कुळवणीच्या कामांना वेग आला आहे. मशागत करण्यासाठी बैलजोडय़ांची संख्या कमी झाल्याने ट्रक्टरच्या मागणीत वाढ झाली आहे. याबरोबरच शेणखत घालणे, बांध घालणे, बैलांच्या साहाय्याने कुळवणीचे काम सुरू आहे.

आवश्यक बी-बियाणे, खते व अवजारे उपलब्ध करण्याची मागणी

काकती, उचगाव, हिरेबागेवाडी आदी ठिकाणी रयत संपर्क केंदे आहेत. नंदिहळळी, बेळगुंदी, मारिहाळ, मुत्नाळ, मोदगा, हलगा, भेंडिगेरी, के. के. कोप्प, बडाल अंकलगी आदी ठिकाणी कृषी पत्तीन संघ आहेत. या ठिकाणी शेतकऱयांना खरीप हंगामासाठी लागणारी आवश्यक बी-बियाणे उपलब्ध नसतात. त्यामुळे शेतकऱयांना ती खासगी दुकानांतून महागडय़ा दराने विकत घ्यावी लागतात. ग्राम पंचायत, लोकप्रतिनिधी, संबंधित अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे पेरणीच्या हंगामावेळी चांगलीच गैरसोय होते. त्यामुळे आवश्यक बी-बियाणे, खते, अवजारे वेळेवर उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी होत आहे.

Related Stories

पूर्वसूचना न देताच रस्ते केले बंद

Amit Kulkarni

मोहरम-शहिदांप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा महिना

Amit Kulkarni

जाहिरात शुल्क वसुली निविदेकडे पाठ

Amit Kulkarni

20 डिसेंबरपासून बेळगाव-दिल्ली फ्लाइट आठवड्यातून 4 वेळा

Abhijeet Khandekar

बसवेश्वर चौकाजवळील मातीचे ढिगारे हटविले

Amit Kulkarni

ग्रा. पं. साठी खानापूर तालुक्यात पहिल्या दिवशी एकच अर्ज दाखल

Patil_p