Tarun Bharat

‘पेरियार’संबंधी टिप्पणी, तामिळनाडूमध्ये वादंग

माफी मागणार नसल्याची रजनीकांतची भूमिका

चेन्नई 

 दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या पेरियारसंबंधी दाव्यावरून तामिळनाडूच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. त्यांच्याविरोधात एफआयआर नोंद झाला आहे, पण रजनीकांत यांनी स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहत माफी मागण्यास नकार दिला आहे. पेरियार संबंधी केलेले विधान सत्य असून वृत्त अहवालावर आधारित असल्याने माफी मागणार नसल्याचे रजनीकांत यांनी सांगितले आहे.

मागील आठवडय़ात तमिळ नियतकालिक तुघलकला रजनीकांत यांनी मुलाखत दिली होती. पेरियार यांनी 1971 मध्ये सालेममध्ये एक रॅली आयोजित केली होती, यात भगवान राम आणि सीता यांची वस्त्रहीन छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली होती असा दावा रजनीकांत यांनी केला होता. रजनीकांत यांच्या या विधानावर आक्षेप घेत द्रविदार विधुतलाई कझगमच्या सदस्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदविली आहे.

पेरियार हे हिंदू देवतांचे टीकाकार होते, पण त्या काळात कुणीच पेरियार यांची निंदा केली नाही असे रजनीकांत यांनी म्हटले होते.

Related Stories

फरार मेहुण्याच्या नावे पाच वर्षे नोकरी…

Patil_p

14 हजार फुटांच्या उंचीवर आइस कॅफे

Patil_p

पश्चिम बंगालमधील हिंसाचार निषेधार्ह

Patil_p

1200 कोटींचे अमली पदार्थ जप्त

Patil_p

‘जाती’चे जहर

Patil_p

हरियाणा सरकारने 5 जुलैपर्यंत वाढविले लॉकडाऊन!

Tousif Mujawar