Tarun Bharat

पेव्हरब्लॉक चोरी प्रकरणाची चौकशी करा

Advertisements

माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांची मागणी ः निपाणी नगरपालिका आयुक्तांकडे तक्रार

वार्ताहर / निपाणी

निपाणी शहरातील प्रभाग 26 मध्ये चार वर्षांपूर्वी पालिकेच्या एसएफसी निधीतून बसविण्यात आलेले, त्याचप्रमाणे सुस्थितीत असणारे मरगुबाई मंदिरनजीकचे पेव्हरब्लॉक कोणतीही परवानगी न घेता काढण्यात आले. त्याचप्रमाणे हे पेव्हरब्लॉक पालिकेची मालमत्ता असताना खासगी जागेत ठेवण्यात आले. खासगी जागेत पेव्हरब्लॉक नेऊन ठेवणे म्हणजे चोरीचाच प्रकार आहे. यासाठी या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्याकडे केली.

याविषयी बोलताना माजी नगराध्यक्ष गाडीवड्डर म्हणाले, सुस्थितीत असताना पेव्हरब्लॉक काढणे ही पहिली चूक करण्यात आली आहे. यानंतर कोणतीही परवानगी न घेता पेव्हरब्लॉक काढले व खासगी जागेत टाकण्याची किमया केली आहे. यानंतर पेव्हरब्लॉक काढलेल्या ठिकाणी काही दिवसांनी नवे पेव्हरब्लॉक घातले. पण कंत्राटदाराने काँक्रिट न केल्याने पुन्हा नव्याने घातलेले पेव्हर काढले आहेत. याला दोन महिने होऊन गेले तरी काम पूर्ण झालेले नाही.

या सर्व प्रकरणात अर्थपूर्ण वाटाघाटी फिस्कटल्याची चर्चा असून याला काही अधिकाऱयांनी दुजोराही दिला आहे. पेव्हरब्लॉक घालताना काँक्रिटचा समावेश होता. असे असताना याकडे संबंधित अधिकारी व स्थानिक नगरसेविका आशा टवळे यांनी का लक्ष दिले नाही. याचीही चौकशी होणे आवश्यक असून कारवाई व्हावी, अशी मागणी आपण केली आहे, असे सांगितले.

याविषयी बोलताना आयुक्त महावीर बोरण्णावर म्हणाले, कोणतीही परवानगी न घेता पेव्हरब्लॉक काढणे आणि ते काढून खासगी जागेत ठेवणे चुकीचे आहे. याविषयी अभियंत्यांकडून पूर्ण माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे सांगितले.

यावेळी नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, डॉ. जसराज गिरे, दत्ता नाईक, अनिस मुल्ला उपस्थित होते.

आपल्या जागेत पेव्हर कोण ठेवले माहित नाही काढण्यात आलेले पेव्हर नगरसेवक राजू गुंदेशा यांच्या जागेत ठेवले आहेत. असा आरोप करण्यात आला आहे. याविषयी बोलताना नगरसेवक गुंदेशा म्हणाले, ही जागा माझी नसून माझ्या काकांच्या नावे आहे. शहराबाहेर असणाऱया या खुल्या जागेत कोण पेव्हर ठेवले. याची आपल्याला माहिती नाही. कोण ठेवले याचा तपास करून पालिकेने संबंधितावर कारवाई करावी, असे स्पष्ट केले.

Related Stories

जमखंडीत पाच लुटारूंची टोळी जेरबंद

Patil_p

बाजारपेठेत दिवाळीच्या साहित्याची आवक वाढली

Amit Kulkarni

होम क्वारंटाईनचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा

Patil_p

मातीचा ढिगारा कोसळून दोन कामगारांचा मृत्यू

Amit Kulkarni

कुंतीनाथ कलमनी यांना ‘वृषभश्री’ पुरस्कार

Patil_p

बेळगावमध्ये पासपोर्ट काढणाऱयांच्या संख्येत वाढ

Amit Kulkarni
error: Content is protected !!