Tarun Bharat

पैलवानांनो, मेहनत कमी पडू देऊ नका

सोलापूर

कुस्ती म्हटले की, बलदंड शरीर कमावलेला पैलवान डोळय़ासमोर उभा राहतो. पण लॉकडाऊनच्या काळात सर्व तालीम बंद असल्याने पैलवान आपापल्या घरी सराव करत आहेत. पैलवानांनी व्यायमात चुकारपणा करु नये म्हणून रट्टा मारणाऱया वस्तादांनी ऑनलाईन पैलवानांना मार्गदर्शन करत व्यायामात कसूर न करण्याचा सल्ला दिला आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून वस्तादांनी पालकांशीही संवाद साधला आहे.

कुस्ती म्हणजे केवळ मेहनतीचेच फळ, मारुतीने चिरंजीव केलेली कुस्ती होण्यासाठी पैलवान रगड्ड अंगमेहनत अन् कुस्तीचा सराव करत असतो. पण कोरोनाच्या महामारीमुळे सगळीकडील तालीम बंद झाल्या आहेत. राज्यातील अनेक पैलवान आपापल्या घरीच सराव करीत आहेत. पैलवानांनी सरावात कसूर करुन मागे पडू नये म्हणून आखाड्यात असणाऱया वस्तादांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यायाम कसा करायचा, खुराकात काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले आहे. ‘कुस्ती मल्लविद्या’ या फेसबुक पेजच्या माध्यमातून राज्यातील विविध मोठय़ा तालमीच्या वस्तादांनी ऑनलाईन येत पैलवानांना सल्ले दिले. यात गणेश मानगुडे, कुस्तीसम्राट अस्खलित माझी, अण्णा ढाणे, सोमनाथ चव्हाण यांच्यसह अनेक वस्ताद मंडळींनी संवाद साधला.

दररोज कसून सरावावर भर द्या

सर्व पैलवान लॉकडाऊनच्या काळात घरी आहेत. घरी व्यायामाकडे दुर्लक्ष होते. आईवडिल प्रेमापोटी व्यायामासाठी हट्ट धरत नाहीत. त्यामुळे पुन्हा जेव्हा तालीम सुरु होईल हे सर्व पैलवान तालमीत जातील त्यावेळी त्यांचा वजन गट कमी पडण्याची शक्यता असते. मेहनतीला टाळाटाळ होऊ नये, तसेच पालकांच्या मनातही सराव, खुराकाबाबत अनेक प्रश्न होते. यासाठी आपण फेसबुक लाईव्हद्वारे संपर्क साधला असल्याचे कुर्डु, ता. माढा, जि. सोलापूर येथील नागनाथ तालीमीचे वस्ताद अण्णा ढाणे यांनी सांगितले.

 पैलवानकी हे व्रत आहे, ते घेतले कि निभावावे लागते. त्यासाठी उत्तेजक द्रव्यासारख्या शॉर्टकटकडे पैलवानांनी वळू नये, असाही सल्ला यावेळी दिला. कुस्तीकडे कमी मुले वळतात याबाबत सांगताना, महाराष्ट्रात कुस्तीला राजाश्रय नाही. यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, हरियाणा सारख्या राज्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण जिंकल्यानंतर मल्लांना मोठी रक्कम तसेच नोकरी दिली जाते. या धर्तीवर महाराष्ट्रातील मल्लांनाही प्रोत्साहित करण्यासाठी राज्य सरकराने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही संवादात त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.  

Related Stories

अँडरसनने अश्विन, बोथमला मागे टाकले

Patil_p

नोव्हॅक जोकोविचची सलामी बायेनाशी

Amit Kulkarni

मँचेस्टर युनायटेडचा विजय

Patil_p

कसोटीत ऑस्ट्रेलिया, टी-20 मध्ये भारत अग्रस्थानी

Patil_p

रणजी क्रिकेटपटूंना पन्नास टक्के भरपाई देण्याची शिफारस

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघाचा मोठा पराभव

Patil_p