Tarun Bharat

पैसे देताना मी कोरें सोबत नव्हतो – ग्रामविकास मंत्री

ऑनलाईन टीम / कोल्हापूर

पक्षाचा महापौर करण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला 35 लाख रुपये दिले. त्यावेळी मुश्रीफ आमच्यासोबत होते. असे आमदार विनय कोरे यांनी म्हंटले होते. त्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली. तत्कालीन वेळी आमदार कोरे यांच्यासोबत आम्ही होतो, पण पैसे दिले त्या वेळी मी त्यांच्या सोबत नव्हतो. अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली. तसेच कोरे यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. असेही मुश्रीफ यावेळी म्हणाले. ते कोल्हापुरात बोलत होते.

बळीराजा आज आनंदी; न्यायालयाचे निर्णयाचे स्वागत करत

यावेळी ते पुढे म्हणाले, सर्वाच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णायानुसार बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी मिळाली आहे. त्या निर्णायाचे मी स्वागत करतो, या निर्णयामुळे शेतकरी आणि शौकीन आनंदी झाला आहे. कोल्हापुरात बैलगाडी शर्यत आणि कुस्तीला मोठ महत्व आहे. त्यामुळे आज बळीराजा आनंदी झाला असल्याची प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली.

गव्यांचा बंदोबस्त करू

या गव्यांचा बंदोबस्त करावी यासाठी वन विभागाशी चर्चा केली आहे. त्यांना ताबडतोब बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गव्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

कोरेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला

चार दिवसांपूर्वी आमदार यांनी पक्षाचा महापौर करण्यासठी आर्थिक देवाण झाली. त्यावेळी मुश्रीफ आमच्यासोबत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला होता. त्यावर मुश्रीफ यांनी आज प्रतिक्रिया दिली. महापालिकेत विनय कोरे यांच्यासोबत मी होतो पण पैसे देताना मी नव्हतो. त्यांच्या बोलण्याचा उद्देश वेगळा होता तो चुकीच्या पद्धतीने घेतला गेला. घोडेबाजार थांबविण्यासाठी कोरे यांनी पुढाकार घेतला होता. त्याची आठवण त्यांनी सांगितली. त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. असे मुश्रीफ म्हणाले. महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, ते ज्या त्या पक्षाच्या ताकदीनुसार ठरेल. असे मुश्रीफ यांनी म्हंटले आहे.

ओबीसींचा डेटा केंद्राकडे मागणे चुकीचे नाही

भाजप महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवल्याचा आरोप केला आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. 2011 ला जातिनिहाय जनगणना झाली असताना त्यांनी डेटा उपलब्ध करून दिला नाही. देवेंद्र फडणवीस,पंकजा मुंडे यांनी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवली होती. मग कोणत्या आधारे केंद्र शासनाकडून डाटा मागणे चुकीचा आहे. असे आज भाजप म्हणते असा सवास मंत्री मुश्रीफ यांनी केला.

पडळकरांना आवरलं पाहिजे

भारतीय जनता पक्षाने आमदार ओबीसींचा डेटा यांना आवरलं पाहिजे. अशा वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असं बोलण्याचं लायसन मिळाले असे समजण्याची गरज नाही. बोलताना भान राखण्याची गरज आहे. अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली आहे. हे भाजप ने ओळखण्याची गरज आहे. असे मुश्रीफ म्हणाले.

Related Stories

सांगा सांगा फुटपाथ कोणाच्या मालकीचे?

Patil_p

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर

Archana Banage

20 वर्षे मुंबईवर राज्य करणाऱ्यांनी स्वत:ची घरं भरली -देवेंद्र फडणवीस

Archana Banage

सांगरुळ येथील कुमार विद्या मंदिरच्या चार एलईडी, टीव्ही संच चोरीस

Archana Banage

कोल्हापूर : करवीर तहसिलदारांची कोगे ग्रामपंचायतीस भेट, मान्सून पूर्व पूरपरिस्थितीचा घेतला आढावा

Archana Banage

पुणे विभागातील 5 लाख 5 हजार 508 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar