Tarun Bharat

पै.पृथ्वीराज पाटीलची सिनियर वर्ल्ड चॅम्पियनशीप कुस्ती स्पर्धेसाठी निवड

सांगरुळ / प्रतिनिधी

नॉर्वे देशातील ओस्लो या ठिकाणी होणा-या जागतिक सिनियर कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघाची काल दि. ३१ ऑगस्ट रोजी निवड चाचणी स्व.खाशाबा जाधव इनडोअर कुस्ती स्टेडियम याठिकाणी पार पडली. या चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पृथ्वीराज पाटील याने ९२ किलो फ्री स्टाईल मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध केले. ९२ किलो मध्ये या चाचणीत पृथ्वीराजला कोणीच आव्हान दिले नाही. त्यामुळे भारतीय संघात ९२ किलो‌ वजनी गटातून पृथ्वीराजची जागतिक सिनियर कुस्ती स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

मागील आठवड्यातच जागतिक ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराजने कास्यपदकाची कमाई केली आणि आता पृथ्वीराज हा जागतिक सिनियर कुस्ती स्पर्धेसाठी खेळणार असल्याने देशबरोबरच महाराष्ट्राच्या आशा ह्या पृथ्वीराजच्या रुपाने पल्लवित झाल्या आहेत .पै.पृथ्वीराज पाटील हा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे जि.कोल्हापूर चा सुपूत्र आहे.सध्या शिंगणापुर (ता. करवीर) येथील राजर्षी शाहू आखाड्यामध्ये वस्ताद जालंदर मुंडे. आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शिवाजी पाटील व कोच सुनील फाटक यांचे मार्गदर्शनाखाली सराव करत आहे .उपमहाराष्ट्र केसरी पै संग्राम पाटील महाराष्ट्र चॅम्पियन धनाजी पाटील वडील बाबासाहेब पाटील व आजोबा मारुती पाटील यांचे त्याला मार्गदर्शन होत आहे. पृथ्वीराजच्या या निवडीमुळे कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्रातून समाधान व्यक्त होत असून त्याचे अभिनंदन होत आहे.

Related Stories

न्यूझीलंडविरुद्ध भारताचा धुव्वा

tarunbharat

सातारा सावरतोय; शहरात केवळ 240 सक्रीय रुग्ण

Patil_p

चिंताजनक : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांनी ओलांडला 29.04 लाखांचा टप्पा

Tousif Mujawar

जिह्यातील उपकेंद्रात डॉक्टर देणार सेवा

Patil_p

प्रलंबित मागण्या 15 दिवसांत मार्गी लावणार

Archana Banage

150 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत

Amit Kulkarni