Tarun Bharat

‘पॉझिटिव्ह’ची संख्या 99 वरून 113 वर

  • जिल्हय़ात 53 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित
  • 20 हजार 706 व्यक्ती होम क्वारंटाईनमुक्त

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात अखेर कोरोना बाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. नव्याने आणखी 14 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले आहेत त्यामुळे जिल्हय़ात एकूण कोरोना बाधितांची संख्या 113 वर गेली आहे. जिल्हय़ात ठिकठिकाणी कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने 53 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंत 20 हजार 706 जणांना होम क्वारंटाईन मुक्त करण्यात आले आहे. तर जिल्हा रुग्णालयामध्ये आतापर्यंत दाखल झालेल्या 1 हजार 329 व्यक्तींपैकी 1 हजार 225 व्यक्तींना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 102 व्यक्ती जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

जिल्हय़ात 4 जूनपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 99 होती. त्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा सहाजणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. सायंकाळी आठजणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे रुग्ण संख्या वाढून एकूण 113 झाली आहे. नव्याने आढळलेल्या 14 रुग्णांमध्ये देवगड तालुक्यातील नाडण येथील तीन, वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील एक आणि कणकवली तालुक्यातील पाचजणांचा समावेश आहे. यात कणकवली दोन, नाटळ एक, घोणसरी एक, हरकूळ एक. कुडाळ तालुक्यात तीन रुग्ण आढळले असून यामध्ये साळगाव एक, हिर्लोक एक, पडवे एक. मालवण तालुक्यामध्ये ओवळिये एक आणि सावंतवाडी तालुक्यात ओटवणे एक आदींचा समावेश आहे. आतापर्यंत आढळलेल्या एकूण 113 रुग्णांपैकी 17 रुग्ण बरे होऊन कोरोना मुक्त झाले असून सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण मुंबईला उपचारासाठी गेला आहे. त्यामुळे जिल्हय़ात सद्यस्थितीत 93 रुग्ण आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल आहेत.

जिल्हय़ात 53 कंटेनमेंट झोन घोषित

जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने ज्या गावात किंवा वाडय़ांमध्ये रुग्ण सापडत आहेत, त्या-त्या ठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी कंटेनमेंट झोन घोषित करण्यात येत आहेत. त्याप्रमाणे जिल्हय़ात आतापर्यंत 53 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित असून त्यातील 49 झोन हे सद्यस्थितीत सुरू आहेत. तर चार ठिकाणी सक्रीय नाहीत.

जिल्हय़ातील सद्यस्थितीत असलेल्या कंटेनमेंट झोनची माहिती पुढीलप्रमाणे : कणकवली तालुक्यातील तळेरे, नाटळ, कुरंगवणे, नवीन कुर्ली वसाहत, जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, मौजे वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी येथील बीडवाडी हायस्कूल व आवार,  कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्मयात भुईबावडा गावातील बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, वेंगसर गावातील बंदरकरवाडी, तिरवडे तर्फ सौंदळ गावातील घागरेवाडी, कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी आणि उंबर्डे हे कंटेनमेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्मयातील कारिवडे गावठणवाडी, माडखोल येथील बामणादेवीवाडी, निरवडे माळकरवाडी,  बांदा गाव गवळीटेंबवाडी, असनिये येथील भटवाडी, धनगरवाडी, वायंगणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. कुडाळ तालुक्मयात पणदूर-मयेकरवाडी, आंब्रड वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, पडवे पहिलीवाडी, गावराई टेंबवाडी, रानबांबुळी पालकरवाडी. मालवण तालुक्मयात चिंदर देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड राऊळवाडी व ठाकरवाडी. तर वेंगुर्ले तालुक्मयात मातोंड.

20 हजार 706 व्यक्ती होम क्वारंटाईन मुक्त

जिल्हय़ामध्ये मार्च अखेरीस कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर जिल्हय़ाबाहेरून येणाऱया व संशयित व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात येत होते. त्याप्रमाणे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींमधून एकूण 20 हजार 706 व्यक्तींना आतापर्यंत होम क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले आहे. तसेच कोरोनाची लक्षणे दिसणाऱया संशयित रुग्णांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येत होते. त्याप्रमाणे आतापर्यंत 1329 व्यक्तींना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पैकी 1225 व्यक्तींना घरी सोडण्यात आले. सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये 102 व्यक्ती उपचाराखाली आहेत. दरम्यान जिल्हय़ात सध्या 44 हजार 637 व्यक्ती निरिक्षणाखाली असून 13 हजार 399 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. 31 हजार 787 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.

पाठविण्यात आलेले एकूण नमुने               02324

अहवाल प्राप्त झालेले नमुने                      02221

आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने                    00113

निगेटिव्ह आलेले नमुने               02113

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                    00103

सद्यस्थितीत जिल्हय़ात सक्रिय रुग्ण           00093

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण                    00017

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या                  00002

विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण            00100

शुक्रवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 03758

निरीक्षणाखालील व्यक्ती             44637

गृह अलगीकरणातील व्यक्ती                     13399

संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती           31787

14 दिवसांचे अलगीकरण संपलेल्या व्यक्ती  20706

रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्ती           01329

रुग्णालयातून घरी सोडलेल्या व्यक्ती          01225

सध्या रुग्णालयात असलेल्या व्यक्ती           00102

जिल्हय़ातील कंटेनमेंट झोन                     00053

सक्रिय कंटेनमेंट झोन                 00049

असक्रिय कंटेनमेंट झोन               00004

जिल्हय़ात आलेल्यांची संख्या                   74591

कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय स्थिती

कणकवली        39

मालवण            16

कुडाळ              18

सावंतवाडी      15

देवगड             13

वैभववाडी       09

वेंगुर्ले              03

एकूण              113

Related Stories

अन्यायाची तक्रार दिल्ली दरबारी करणार!

NIKHIL_N

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी

Anuja Kudatarkar

तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेत अस्मि मांजरेकर प्रथम

Anuja Kudatarkar

कोनाळ येथील शेतकर्‍यांचे गवारेड्यांकडून नुकसान

Anuja Kudatarkar

विनाअनुदानित तुकडय़ांचा मुद्दा ऐरणीवर

NIKHIL_N

महामार्ग चौपदरीकरणात हरवतेय ‘गावपण’..!

Patil_p