Tarun Bharat

पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्राला जामीन नाहीच, आता सुनावणी २० ऑगस्टला

मुंबई/प्रतिनिधी

पॉर्नोग्राफी प्रकरणीराज कुंद्राला जामीन नाकारला आहे. व्यवसायिक राज कुंद्राच्या तुरुंगवासाची मुदत मंगळवारी सत्र न्यायालयाने वाढवली आहे. त्यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपली, मात्र, गुन्हे शाखेनं 19 कारणं देत त्याला विरोध केला त्यामुळे आता न्यायालयानं ही सुनावणी पुढे ढकलली आहे. अश्लील सामग्रीची निर्मिती आणि अपलोड केल्याच्या आरोपावरून त्यांच्या जामिनाची सुनावणी आता २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती 19 जुलैपासून कोठडीत आहेत.

जामिनाला विरोध करत गुन्हे शाखेने नमूद केले की कुंद्रा एक प्रभावशाली व्यक्ती असल्यानं तो ‘पुराव्यांशी छेडछाड’ करू शकतो आणि ‘साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो’. त्यांनी हे देखील निदर्शनास आणलं की तो एक ब्रिटिश नागरिक असल्याने, तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तपास अधिकारी किरण बिडवे यांनी आपल्या उत्तरात म्हटलं आहे की, कुंद्राला अटक होण्यापूर्वी बरेच पुरावे नष्ट करण्यात आले आहेत आणि जामीन दिल्यास तो अधिक पुरावे मिटवू शकतो. कुंद्रा लंडनमध्ये नोंदणीकृत केनरीन लिमिटेडच्या माध्यमातून हॉटशॉट्स अॅप नियंत्रित करत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे, हे अॅप त्यांचे मेहुणे प्रदीप बक्षी यांचं असल्याचंही म्हटलं जातंय.

Related Stories

रविकांत तुपकरांसह 25 जणांना जामीन मंजूर

datta jadhav

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर होणार निवडणूक

Amit Kulkarni

राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट अखेर सुरू

Tousif Mujawar

गटशिक्षणाधिकारी धुमाळांच्यात सुधारणेसाठी खासदार, आमदारांनीच लक्ष घालावे

Archana Banage

कोरोना महामारीतही ‘मृत्यू दरात घट’..!

Archana Banage

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 7 हजार 447 वर

prashant_c