Tarun Bharat

पोंबुर्फा खाजन रस्ता खाऱया पाण्यामुळे धोकादायक स्थितीत

भरतीवेळी समुद्राचे पाणी रस्त्यावरून वाहते. रस्ता खचला. खाऱया पाण्यामुळे मिरची, केळी पिकाची नासाडी. शेतकऱयांचे नुकसान. वाहनचालकांच्याही जिवितास धोका. सरकारचे दुर्लक्ष.

डिचोली/प्रतिनिधी

पोंबुर्फा फेरीकडे जाणारा खाजन शेतातील रस्ता समुद्राच्या खाऱया पाण्यामुळे सध्या जलमय झाला असून भरतीच्यावेळी येथून वाहने घेऊन जाणे धोक्मयाचे बनले आहे.येथील कातर खाजन आणि कावा खाजनाचा बंधारा कमकुवत बनल्याने समुद्राचे पाणी मोठय़ा प्रमाणात खाजनात घुसले आहे. पोंबुर्फा फेरीकडे जाणारा हा रस्ता पाण्याने ओथंडून वाहत असल्याने वाहन चालक तसेच प्रवाशी अडकुन पडत आहेत. पाण्याच्या प्रवाहाचा जोर मोठा असल्याने येथून वाहने घेऊन जाणे जिवीतास धोक्मयाचे बनले आहे. पाण्यामुळे रस्ता खचलेला आहे. हा रस्ता मातीचा भराव टाकुन केला असल्याने कधीही पाण्याच्या लोटामुळे वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे चोडणवसियांच्या दळणवळणाचा संपर्कच तुटण्याची शक्मयता निर्माण झाली आहे.

याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून समस्या सोडवावी अशी मागणी येथील माजी पंच तथा माजसेवक संजय (गांधी) कळंगुटकर, दशरथ मापारी, सगुण दळवी, संजय कांदोळकर, अशोक कांदोळकर, विश्वजित मांदेकर, प्रकाश कासकर, किशोर आमोणकर, स्वप्न?श कांदोळकर आदींनी पत्रकारांसमोर बोलताना केली आहे.

गेल्या कित्तेक वर्षांपासुन कावा आणि कातर खाजन बंधाऱयाची दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी करीत आहे. कातर खाजनात 300 व कावा खाजनात 150 शेतकरी आहेत. खाजन समिती फक्त मानसांच्या लिलावापुरतीच अस्तित्वात आहे. खाजन समिती व शासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. शेतीचे नुकसान झाले आहे. मिरची लागवड केली होती, ती खाऱया पाण्यामुळे उध्वस्त होऊन हजारोंचे नुकसान झालेले आहे. खाऱया पाण्याच्या घुसखोरीने केळी आणि अन्य झाडे मरुन गेली आहेत. संबधीत खात्याकडे कैफीयत मांडल्यास ते कानावर हात ठेवीत आहेत. आम्ही गरिबांनी आता कुणाकडे पाहावे. सगळी मेहनत पाण्यात गेल्याचे येथील शेतकरी दशरथ मापारी यांनी सांगितले.

ह्या संबंधी आमदार, जिल्हा पंचायत सदस्य, पंचायत यांच्याकडे तक्रारी करून तसेच वेळोवेळी मागणी करून झाली. परंतु त्याचा काहीच फायदा नाही. जर सरकारने या प्रकरणी त्वरीत ठोस कृती केली नाही तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग पत्कारावा लागेल, असे संजय कांदोळकर यांनी सांगितले.

रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने याच खाऱया पाण्यातुन वाहने चालवावी लागतात. खाऱया पाण्याच्या संसर्गामुळे वाहनांन जंग लागत आहे. त्यामुळे नवीन वाहने खराब होत असल्याचे संजय कळंगुटकर यांचे म्हणणे असुन आमदार प्रविण झांटय़, शेतकीमंत्र्यांनी लक्ष घालुन समस्येचे निवारण करावे अशी मागणी कळंगुटकर यांनी केली आहे.

Related Stories

वास्को भाजपाकडून स्वातंत्र्यसैनिक श्रीकांत धारगळकर यांचा सन्मान

Amit Kulkarni

वास्कोतील टुरिष्ट हॉस्टेलमध्ये राजस्थानी ग्रामीण मेळा

Amit Kulkarni

नौदलाच्या वरिष्ठ खलाशांसाठी बांधलेल्या निवासी प्रकल्पाचे उद्घाटन

Amit Kulkarni

कामगार संघटनांच्या देशव्यापी संपाला गोव्यात प्रतिसाद

Patil_p

भाजपासमोर बंडखोरीचे संकट

Amit Kulkarni

पेडणे तालुक्मयात पाच दिवसांच्या गणपतीचे थाटात विसर्जन

Amit Kulkarni