Tarun Bharat

पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

Advertisements

प्रतिनिधी /फलटण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून, शिट्टी वाजवून तिच्याकडे बघून हसून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणारा, लग्नाची वरात तिच्या घरासमोरून जात असताना आरोपी हा विचित्र हावभाव करून नाचला त्यामुळे फिर्यादीच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. तु माझ्याशी लग्न कर नाहीतर पळवून नेईन, अशी धमकी दिल्याने आरोपी रोहित ज्ञानेश्वर कांबळे (वय 22, रा. मंगळवार पेठ फलटण) याने दिली. यामुळे त्याच्याविरूद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. या पोक्सो गुन्हाअंतर्गत त्याला 3 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  या गुह्याचा तपास फलटण शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. गोडबोले यांनी आरोपीविरूद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले हेते. हा खटला विशेष जिल्हा सत्र न्यायधीश यांच्या कोर्टात चालला होता. या केसमध्ये एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरून आरोपीस 3 वर्ष सक्तमजूरी व 5 हजार रूपये दंड कैद अशी शिक्षा ठोठावली. फलटण विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पैरवी अधिकारी सहा पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी परिश्रम घेतले. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव घोरपडे यांच्यासह सहाय्यक महिला फौजदार उर्मिला घारगे, पोलीस हवालदार शमशुद्दीन शेख, गजानन फरांदे, महिला पोलीस नाईक रेहाना शेख, पोलीस कॉन्टेबल राजेंद्र कुंभार, अमित भरते यांनी योग्य ती मदत केली.

Related Stories

कोरोनामुक्त रुग्णांचा जिल्हय़ाला दिलासा

Patil_p

फेसबुकवरील फोटो महिलांची बदनामी करणारा गजाआड

Omkar B

थकबाकीदारांचे होणार पाणी कनेक्शन कट

Patil_p

महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

datta jadhav

काही चांगलंही घडतंय…

datta jadhav

ऐन 31 डिसेंबरला कांदा महागला

Patil_p
error: Content is protected !!