Tarun Bharat

पोटच्या मुलीवर शारीरिक अत्याचार

नात्याला काळीमा फासणाऱया घटनेने संताप

वार्ताहर/ संगमेश्वर

बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे   उघडकीस आली आहे. आपल्याच मुलीवर शारीरीक अत्याचार करणाऱया नराधम विष्णू तुकाराम ओकटे (48) याला  मुंबईतील पंतनगर पोलिसांनी कडवई या मूळ गावातून अटक केली आहे.

विष्णू ओकटे पत्नी दोन मुली, एक मुलासह मुंबई येथील पंतनगर घाटकोपर पूर्व येथे राहतो. तो मॉलमध्ये सुपरवायझरची नोकरी करतो. घाटकोपर येथे  काही  महिन्यांपुर्वी आपल्या अल्पवयीन मुलीशी त्याने जबरदस्ती केली होती. घाबरलेल्या मुलीने आईला हा प्रकार सांगण्यासाठी धाव घेताच  ‘तू असे केलेस तर मी मरुन जाईन’ अशी धमकी त्याने दिली. या धमकीमुळे मुलगी तणावाखाली वावरत होती. त्याने त्यानंतर मुलीवर अनेकदा अत्याचार केले.

लॉकडाऊनच्या काळात या प्रकारातून सुटका मिळवण्यासाठी मुलगी संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे आपल्या मूळ गावी आली. मात्र काही निमित्ताने विष्णूही गावी आला. तेथेही त्याने अत्याचार सुरुच ठेवला. यातून ती गर्भवती राहील्याने  बदनामीच्या भीतीने मुलीने मुंबई गाठली. तिने बहिणीला सारा प्रकार सांगितला. त्यानंतर काही दिवसांनी तिला हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे एका मुलाला तिने जन्म दिला. त्यानंतर या मुलीने नराधम बापाविरोधात तक्रार दाखल केली.

याबाबत मुलीच्या जबाबावरुन पंतनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे विष्णू तुकाराम ओकटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलिसांनी कडवई येथून ओकटे याला अटक केली. नात्याला काळीमा लावणाऱया या नराधमाविरुघ्द कठोर आणि कडक कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Stories

महाराष्ट्र चेंबरतर्फे राज्याच्या अर्थसंकल्पाचे स्वागत- ललित गांधी

Anuja Kudatarkar

आत्मनिर्भर अभियान पॅकेज चाकरमान्यांपर्यंत पोहोचविणार!

NIKHIL_N

राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेत बदल, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Archana Banage

मासेमारीच्या अटी रद्द करा, मच्छीमारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Abhijeet Khandekar

कंपनीचे आठ लाख हडप केलेल्या तरुणास वर्षभरानंतर अटक

Patil_p

‘कोरोना’ला नक्कीच हरवू

NIKHIL_N