Tarun Bharat

पोटनिवडणुकीचा आज होणार फैसला

प्रतिनिधी/बेंगळूर

राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असतानाच मंगळवार दि. 10 नोव्हेंबर रोजी दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे निकालाविषयी उत्सुकता लागून राहिली आहे. मतदारांचा कौल कोणाच्या पारडय़ात पडेल याविषयी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल.

बेंगळूर शहर जिल्हय़ातील राजराजेश्वरीनगर आणि तुमकूर जिल्हय़ातील सिरा मतदारसंघात 3 नोव्हेंबर रोजी मतदान झाले होते. मंगळवारी दोन्ही मतदारसंघांत मतमोजणी होणार आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. राजराजेश्वरीनगरमधून भाजपचे मुनिरत्न, काँग्रेसच्या कुसुमा आणि निजदचे कृष्णमूर्ती यांच्यात चुरस आहे. तर सिरा मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. राजेश गौडा, काँग्रेसचे टी. बी. जयचंद व निजदच्या अम्माजम्म यांच्यात रस्सीखेच आहे. तिन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपला उमेदवार निवडून येईल, असा दावा केला आहे. परंतु, विजय कोणाच्या पारडय़ात पडेल, हे मंगळवारीच समजणार आहे.

राजराजेश्वरीनगर संवेदनशील मतदारसंघ असून मतमोजणी आणि निकालानंतर कोणत्याही अनुचित घटना घडू नयेत यासाठी बेंगळूर शहर पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. राज्य राखीव सुरक्षा दलाचे जवानही येथे तैनात करण्यात आले आहेत. शिवाय जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. सिरा मतदारसंघातही सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

Related Stories

कर्नाटक: भाजप-जेडीएस विधानपरिषद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट

Archana Banage

कर्नाटकमध्ये भीषण अपघात, ८ जण ठार

Archana Banage

मंगळूर पोलिसांनी ३८ श्रीलंकन नागरिकांना केली अटक

Archana Banage

केएसआरटीसीच्या व्यवस्थापकीय संचालकांची मॅजेस्टिक बस टर्मिनलला भेट; बस सुविधांची केली पाहणी

Archana Banage

कोव्हॅक्सिनच्या अंतिम टप्प्यातील चाचणीला बेंगळुरात प्रारंभ

Omkar B

कर्नाटक : आता सरकारी सेवा थेट नागरिकांच्या दारी

Archana Banage