Tarun Bharat

पोटनिवडणूक सरकारसाठी धोक्याची घंटा: सिद्धरामय्या

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकात दोन जागांसाठी विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. राज्यात निवडणुकीदरम्यान राजकारण तापलेलं पहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी आर. आर. नगर आणि सिरा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही भाजपा सरकारसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचं म्हंटल आहे.

सिद्धरामय्या यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सरकार लोकविरोधी आणि भ्रष्ट आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत मतदार भाजप उमेदवारांना धडा शिकवतील. सरकार मतदारांना अनेक प्रकारचे आमिष दाखवू शकते. त्यामुळे मतदारांनी सतर्क राहिले पाहिजे असे ते म्हणाले.

पोटनिवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर होण्याची भीती

सिद्धरामय्या यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार टी. बी. जयचंद्र केवळ काही मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यावेळी ते नक्कीच बाजी मारतील. दरम्यान या पोटनिवडणुकीत सरकारी यंत्रणेचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.

सिद्धरामय्या यांनी दोन्ही मतदार संघातील नेते व कार्यकर्त्यांना बारकाईने नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बेकायदेशीर कृती झाल्यास कायदा हातात घेऊ नये व पोलिसांची मदत घ्यावी असे त्यांनी सूचविले म्हंटले आहे.

Related Stories

बेंगळूरमधील 28 मतदारसंघांमध्ये पदवी महाविद्यालये स्थापणार

Amit Kulkarni

कर्नाटक : नंदी टेकड्यांचा आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार

Archana Banage

ड्रॅग रॅकेट: अभिनेत्री संजनाला भेटलो नाही: आमदार जमीर अहमद

Archana Banage

भाजपने दलित नेत्याला मुख्यमंत्री करावे: सिद्धरामय्या

Archana Banage

कर्नाटक : केरळ सीमेवर उभारले ६ तपासणी नाके; राज्यात येणाऱ्यांची होणार कडक तपासणी

Archana Banage

कर्नाटक : मुख्यमंत्री ८ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार

Archana Banage