Tarun Bharat

पोदार स्कूलतर्फे सायक्लोथॉन उत्साहात

प्रतिनिधी / बेळगाव

कुडची रोडवरील पोदार इंटरनॅशनल स्कूलतर्फे फिट इंडिया उपक्रमांतर्गत रविवारी सायकल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. पोदार स्कूलचे विद्यार्थी आणि वंदना कोचिंग क्लासचे विद्यार्थी सदर सायकल मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. सकाळी 6 वाजता पोदार स्कूल येथून मॅरेथॉनला प्रारंभ झाला.

प्रारंभी सीपीआय राघवेंद्र हळ्ळूर तसेच प्राचार्य राज हुलमणी, उपप्राचार्य ईश्वर पाटील यांच्या हस्ते मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. शाळेचे व्यवस्थापकीय अधिकारी अरुण जाधव तसेच मुख्याध्यापिका रूपाली हर्दी, एएसआय कोटबागी आदी उपस्थित होते. फीत कापून निशाण दाखवताच मॅरेथॉनला सुरुवात झाली. पोदार स्कूलपासून कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिर आणि पुन्हा सिद्धेश्वर मंदिरपासून पोदार स्कूल अशा पद्धतीने सायकल मॅरेथॉन पार पडली.

फिट इंडिया उपक्रमांतर्गत सायकल चालविण्याचे महत्त्व विशद करत सदर मॅरेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे संकट धूसर होत असताना शालेय उपक्रमांचा भाग म्हणून हा आगळावेगळा आरोग्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात आला.

सदर उपक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शारीरिक शिक्षण विषयाचे शिक्षक सचिन राजगोळकर, बाळकृष्ण धामणेकर, प्रगती प्रज्ञावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

दुसऱया दिवशीही मान्सूनपूर्व पावसाच्या दमदार सरी

Patil_p

सदाशिवगड माध्यमिक शाळेचा शतमानोतर रौप्य महोत्सव

Patil_p

जन्म-मृत्यू दाखले वितरणास प्रारंभ

Patil_p

कंग्राळी खुर्दमध्ये कोरोना चाचणी शिबिर

Omkar B

अंगणवाडींमध्ये पाळणाघर करण्यास विरोध

Omkar B

निलजी क्रॉसनजीक ओव्हर ब्रिज उभारावे

Amit Kulkarni