Tarun Bharat

पोर्तुगीजांविरुद्धच्या कुंकळ्ळीतील लढय़ाला तोड नाही

आमदार क्लाफासियो डायस यांचे उद्गार, बाळ्ळीतील स्मारकावर पुष्पांजलीचा कार्यक्रम

प्रतिनिधी /कुंकळ्ळी

गोवा मुक्तीसाठी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध कुंकळ्ळीत जो लढा दिला गेला त्याला तोड नाही. कुंकळ्ळीतील लढा हा जागतिक लढा असून कुंकळळीवासियांचे फार मोठे योगदान त्यात लाभले आहे. अशा या कुंकळ्ळी मतदारसंघाचा आमदार म्हणून वावरताना मला स्फूर्ती मिळते व सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दांत  आमदार क्लाफासियो डायस यांनी बाळ्ळीत बोलताना स्वातंत्र्यसेनानींप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

बाळ्ळी रणसंग्राम प्रति÷ानतर्फे दरवषी 12 डिसेंबर रोजी गोवा मुक्तीलढय़ाशी संबंधित बाळ्ळीतील स्मारकावर पुष्पांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डायस बोलत होते. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदराची भावना व्यक्त केली. डायस पुढे म्हणाले की, बाळ्ळीतही स्मारक उभारून योग्य पाऊल उचलले गेले. तरुण पिढीला प्रेरणा देणारे हे स्मारक आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग, बलिदान यांच्या आठवणींच्या रूपाने ते तरुण पिढीला स्फूर्ती देत राहील. गोवा मुक्तीला 60 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रति÷ानतर्फे आयोजित केल्या जाणाऱया कार्यक्रमांना पूर्ण सहकार्य करू, असे त्यांनी सांगितले. बाळ्ळीत चांगल्या प्रकारचे स्मारक व्हावे ही रास्त मागणी असून जरूर मी ती पूर्ण करण्यास प्राधान्य देईन, असे आश्वासनही डायस यांनी याप्रसंगी बोलताना दिले.

यावेळी अध्यक्ष रोहिदास नाईक यांनी स्मारक व बाळ्ळी रणसंग्राम प्रति÷ानचा आढावा घेतला. सचिव सुनील फातर्पेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तसेच पुढील उपक्रमांविषयी माहिती दिली. यावेळी स्वातंत्र्यसैनिक स्व. गोपीनाथ मुळये नाईक यांचे पुत्र भारत व स्व. सदाशिव यांचे पुत्र विजयानंद, पंच प्रतिमा नाईक, जॉर्जिना गामा, शैलेंद्र फळदेसाई, आगुस्त रिबेलो, बाळळीचे माजी पंच विन्सेंत पिंटो व कॉस्तांव फर्नांडिस, आदेलिन फर्नांडिस व इतर उपस्थित होते. सुरुवातीला दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ मुळये नाईक व इतर दिवंगत स्वातंत्र्यौनिकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली गेली. उपस्थित इतर मान्यवरांनीही स्मारकावर पुष्पांजली वाहिली. सदस्य राजेंद्र नाईक यांनी आभार मानले.

Related Stories

एटीएमद्वारे पैसे चोरणाऱया चोरटय़ांना म्हापशात अटक

Patil_p

डॅन, किओना, आवेलीनो, पर्ल, आदर्शला सुवर्णपदक

Amit Kulkarni

‘संजीवनी’संबंधी कुठलाही निर्णय शेतकऱयांना विश्वासात घेऊनच !

Patil_p

पर्वरी येथे साहा. पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांची पंतप्रधान, गृहमंत्र्यांशी भेट

Amit Kulkarni

काणकोणात नगराध्यक्ष- उपनगराध्यक्षपदांसाठी रस्सीखेच

Amit Kulkarni