Tarun Bharat

पोलादपूरनजीक खैर तस्करीचा ट्रक जप्त

प्रतिनिधी/ खेड

रायगड जिल्हय़ातील पोलादपूरनजीक वनविभागाने शुक्रवारी पहाटे खैराच्या सोलीव ओंडक्यांची तस्करी करणारा ट्रक अडवून ट्रकसह पावणेबारा लाखाचा ऐवज हस्तगत केला. या कारवाईने खैरचोरांचे धाबे दणाणले आहेत.

  वन परिमंडल अधिकारी शाम गुजर, दिलीप जंगम, मच्छिंद्र देवरे, पोलादपूर तपासणी नाक्यावरील वनरक्षक नवनाथ मेटकरी, नीलेश वाघमारे, नीलेश नाईकवाडे, रोहा फिरत्या पथकातील वनपाल आर. जी. पाटील, वनरक्षक अजिंक्य कदम यांनी विनापरवाना खैर सोलीव ओंडक्यांची वाहतूक करणारा जीजे 15/एटी 4704 क्रमांकाचा आयशर ट्रक अडवून वनउपज तपासणी नाका येथे खैर तस्करीचा पर्दाफाश केला. ट्रकचालक हादिस खान (तलासरी), मालक अब्बास खान (भीलाड-गुजरात) यांनी ट्रकमध्ये खैर सोलीव नग 14.112 घनमीटर आकाराचे व 1 लाख 71 हजार 114 रूपये किंमतीचे आणि 10 लाख रूपये किंमतीचा ट्रक असा एकूण 11 लाख 71 हजार 114 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 (1) फ, 41 (2 ब), 42 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Stories

चाकरमानी आगमनाचे धोरण प्रशासनाने निश्चित करावे!

NIKHIL_N

…तर वीज कार्यालयाला टाळे ठोकू

NIKHIL_N

बागायतदारांना व्याजदर माफीचा अध्यादेश पण अर्थसंकल्पात तरतुद शून्य

Kalyani Amanagi

झोळंबेत खुल्या भजन स्पर्धेचे थाटात उद्घाटन

Anuja Kudatarkar

घरातील 27 हजाराचे दागिने लंपास

Patil_p

राष्ट्रीय रायफल असोसिएशनच्या मानद सचिव पदी ऍड.विक्रम भांगले यांची सलग तिसऱयांदा निवड

NIKHIL_N