Tarun Bharat

पोलिसांच्या विरोधानंतरही बैलगाडी शर्यत होणारच : गोपिचंद पडळकर यांचा निर्धार

ऑनलाईन टीम / सांगली :

न्यायालयाचा बंदी आदेश असतानाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी झरे (ता. आटपाडी) येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. या आयोजनामुळे न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने आमदार पडळकर यांना नोटीस बजावली आहे. शर्यतीला बैलगाडय़ा येऊ नयेत यासाठी आटपाडी तालुक्मयाची नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच शर्यत स्थळासह झरे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आला आहे.

असे असले तरी भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर हे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. माझ्या कानावर आले आहे, पोलीस मला अटक करणार आहेत. चर मारले किंवा मला अटक केली तरी शर्यत होणारच असे पडळकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, बैलगाडी शर्यतींमध्ये बैलांचा छळ होत असल्याने उच्च न्यायालयाने शर्यतींवर बंदी घातली आहे. याबाबत बैलगाडी मालक व शर्यत शौकिनांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्या आहेत. तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी आटपाडी तालुक्मयातील झरे येथे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले आहे. पडळकर यांनी शर्यतीची घोषणा केल्यापासूनच पोलीस प्रशासन आणि पडळकर हे आमनेसामने आले आहेत. शर्यतीमुळे कोर्टाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी आमदार पडळकर यांना नोटीस पाठवली आहे.

Related Stories

शाहूपुरीत दीड लाखाचा गुटखा जप्त

Patil_p

कोकण मार्गावर आणखी एक फेस्टिवल स्पेशल रेल्वे धावणार

Archana Banage

मातृभाषेतून शिक्षणावर भर हवा, शिक्षणमंत्री केसरकर यांची अपेक्षा

datta jadhav

उत्तर प्रदेशच्या मजूरांना परत आणणार : योगी आदित्यनाथ

prashant_c

‘फोटोग्राफर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे स्वामी सुंदरानंद यांचे देहावसान

Tousif Mujawar

Ratnagiri : मत्यस्यगंधा एक्स्प्रेसमधून ९३ हजारांची दारू जप्त

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!