Tarun Bharat

पोलिसांनीच विकला जप्त केलेला 169 किलो गांजा

Advertisements

दोन उपनिरीक्षकांसह चारजण निलंबित

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

गांजा तस्कराकडून जप्त केलेल्या 170 किलो गांजापैकी 169 किलो गांजाची परस्पर विक्री केल्याप्रकरणी दिल्लीतील जहांगीरपुरी पोलीस ठाण्यातील दोन उपनिरीक्षक आणि दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त विजयंता आर्या यासंदर्भात माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, 11 सप्टेंबरला जहांगीरपुरी पोलीस ठाण्यातील एका हवालदाराने अनिल नावाच्या गांजा तस्कराला अटक केली. त्याच्याकडून 170 किलो गांजा जप्त करणात आला. मात्र, हवालदाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने पोलीस ठाण्यातील रेकॉर्डमध्ये अनिलकडून 920 ग्रॅम गांजा जप्त केल्याचे दाखवले. उर्वरित गांजा निलंबित पोलिसांनी परस्पर विक्री केला.

अनिलकडून 920 ग्रॅम गांजा जप्त केल्याचे दाखवल्यामुळे त्याला जमीन मिळाला. त्यानंतर हवालदारने आपल्या तीन पोलीस साथीदारांच्या मदतीने गांजा एका पुरवठादाराला लाखो रुपयांना विकला आणि पैसे वाटून घेतले. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचल्याने ही बाब उघड झाली. निलंबित पोलिसांच्या विभागीय चौकशीचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

Related Stories

कोरोना : दिल्लीत मागील 24 तासात 134 नवे रुग्ण; एकही मृत्यू नाही

Rohan_P

भिकारी समजून द्या मत

Patil_p

पाकव्याप्त काश्मीर भारतात दाखवल्यामुळे दोन पाकिस्तानी पत्रकारांना नारळ

datta jadhav

आयटी रिटर्न सादर करण्याचा कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत

Amit Kulkarni

औषधांच्या काळाबाजारावर राज्यांनी कठोर कारवाई करावी

Patil_p

नोटाबंदीविरोधी याचिकांवर 24 नोव्हेंबरला सुनावणी

Patil_p
error: Content is protected !!