Tarun Bharat

पोलिसांनी आरोग्य व आहाराकडे लक्ष देणे गरजेचे : डॉ.मोहन आगाशे

ऑनलाईन टीम / पुणे :

समाजाकरीता पोलीस अखंडपणे सेवा देतात. मात्र, स्वत:च्या गरजा ते आपणहून सांगत नाहीत. पोलिसांनी केवळ स्वत:च्या डोळ्यांची काळजी न घेता संपूर्ण आरोग्य व आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिला वर्ग संख्यात्मक दृष्टया पोलीस खात्यामध्ये वाढत आहे. त्यामुळे अबला महिला आता सबला झाल्याचे चित्र देखील कौस्तुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते डॉ.मोहन आगाशे यांनी व्यक्त केले.

आनंदवन बहुउद्देशीय संस्था आणि जनसेवा आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डेक्कन, शिवाजीनगर व विश्रामबाग अशा तीन पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत पोलिसांच्या नेत्र तपासणीला डेक्कन पोलीस स्टेशन येथून प्रारंभ झाला. त्यावेळी डॉ.आगाशे बोलत होते. विश्रामबाग विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, डेक्कन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे आदी उपस्थित होते.


डॉ. अजय दुधाणे म्हणाले, कोविड काळात पोलिसांनी नागरिकांची सेवा केली. त्यामुळे पोलिसांचे आरोग्य उत्तम रहावे, याकरीता पोलिसांसाठी नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. जे समाजाचे रक्षक आहेत, त्यांच्या आरोग्याचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी आपण कायम उभे रहायला हवे, असेही त्यांनी सांगितले. डेक्कन, शिवाजीनगर व विश्रामबाग अशा तीन पोलीस स्टेशन मधील सुमारे 170 हून अधिक पोलिसांची तपासणी व चष्मे वाटप करण्यात आले.

Related Stories

सोलापूर शहरात ८८, ग्रामीणमध्ये ३३ नव्या रुग्णांची भर

Archana Banage

सोलापूर जिल्ह्यातील ३६ हजार शेतकऱ्यांच्या बांधावर बियाणे

Archana Banage

रुपाली चाकणकर पक्ष सोडून जाणार होत्या मी त्यांना थांबवल- चित्रा वाघ

Archana Banage

अर्धवेळ PhD करण्यास यूजीसीची मान्यता

datta jadhav

वेदांता ग्रुपचा प्रकल्प गुजरातला जाऊ देऊ नका; अजित पवार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Archana Banage

गुजरातचा विकास भाजपच करु शकतो सिध्द झाले- देवेंद्र फडणवीस

Archana Banage