Tarun Bharat

पोलिसांनी रोखल्याने मानखुर्द चेकपोस्टवर सदाभाऊ खोत यांचे ठिय्या आंदोलन

मुंबई / प्रतिनिधी

मंत्रालया समोर एसटी कर्मचाऱ्यांसह आंदोलनासाठी निघालेल्या माजी कृषिमंत्री व भाजप नेते सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी मानखुर्द चेकपोस्टवर रोखले असून तेथेच त्यांनी अन्न त्यागाची घोषणा करत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगितले की, “मंत्रालय येथे होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास महाराष्ट्रातून अनेक एसटी कर्मचारी दाखल झाले आहेत. परंतु मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यांवर महाविकास आघाडी सरकारने मानखुर्द चेकपोस्ट येथे पोलीस बंदोबस्त लावून एसटी कर्मचाऱ्यांना अडवले जात असुन या गोष्टीचा निषेध करण्यासाठी मी इथेच ठीय्या अंदोलन करत आहे.” आ. सदाभाऊ खोत यांनी रस्त्यावर बसून निषेध केला व तिथेच अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे.

एसटी महामंडळाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलनात उतरले आहेत. त्या आंदोलनाला भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला असून विविध मार्गांनी मुंबईत आंदोलनस्थळी पोहोचण्याचा एसटी कर्मचारी आणि भाजप नेते प्रयत्न करत आहेत. तर मंत्रालयाच्या आवारात आंदोलन होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Related Stories

सांगा ताई आम्हाला न्याय कधी मिळणार

Archana Banage

‘वारणा’ने एकरकमी एफआरपी १४ दिवसांत द्यावी

Archana Banage

देवदासी भगिनी, रुग्ण, चिमुकल्यांना गणेशाचा महाप्रसाद

Tousif Mujawar

क्रांतिकारक हुतात्मा राजगुरू यांना पोवाड्यातून वंदन

Tousif Mujawar

‘तरुण भारत’ इंपॅक्ट : पुलाची शिरोली उपकेंद्राला औषध पुरवठा

Abhijeet Khandekar

पालिकांसाठी वॉर्डात तिघाडीच्या हालचाली

Patil_p
error: Content is protected !!